मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Sleep Disorders : तुम्हाला ही आहे झोपण्याचा त्रास? पहा सायन्स काय सांगतं

Sleep Disorders : तुम्हाला ही आहे झोपण्याचा त्रास? पहा सायन्स काय सांगतं

Warning Signs Of Sleep Disorder : झोपेच्या बाबतीत गंभीर समस्या उद्भवत असतील तर त्याचा थेट परिणाम हा निद्रा विकार म्हणजेच स्लीप डिसॉर्डर (sleep disorder) च्या माध्यमातून समोर येतो. उशीर होण्याआधीच जाणून घ्या लक्षणं

Warning Signs Of Sleep Disorder : झोपेच्या बाबतीत गंभीर समस्या उद्भवत असतील तर त्याचा थेट परिणाम हा निद्रा विकार म्हणजेच स्लीप डिसॉर्डर (sleep disorder) च्या माध्यमातून समोर येतो. उशीर होण्याआधीच जाणून घ्या लक्षणं

Warning Signs Of Sleep Disorder : झोपेच्या बाबतीत गंभीर समस्या उद्भवत असतील तर त्याचा थेट परिणाम हा निद्रा विकार म्हणजेच स्लीप डिसॉर्डर (sleep disorder) च्या माध्यमातून समोर येतो. उशीर होण्याआधीच जाणून घ्या लक्षणं

मुंबई,  15 जानेवारी :  झोपेच्या बाबतीत असलेल्या सर्व समस्या या सामान्य समस्येच्या रूपात पाहील्या जातात. तर अनेक जणांना याचा त्रासही सुरू असतो. आपल्या रोजच्या थकाथकीच्या जीवनात आपण या गोष्टींकडे विशेषता दुर्लक्ष करतो. याशिवाय रोजच्या व्यस्त जीवनात आपण नीट झोपही घेऊ शकत नाही. रात्री उशीरा पर्यत जागणे, मोबाईल वर वेळ घालवणे यामुळे झोपेवर परिणाम होतो. व त्याचा थेट परिणाम हा निद्रा विकारात होऊ शकतो. म्हणजेच स्लीप डिसॉर्डर (sleep disorder). तेव्हा जास्त उशीर होण्याआधीच ही लक्षणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क साधू शकता. हेल्थलाईन या वेबसाईट ने प्रकाशित केलेल्या रिपोर्ट नुसार काही लक्षणं पुढील प्रमाणे आहेत.

स्लीप डिसॉर्डर चेतावनी संकेत: 

  • झोप येण्यासाठी 30 मिनीटांपेक्षा जास्त वेळ लागणे
  • ७-८ तासांची झोप घेतल्यानंतरही चिडचिडेपणा येणे
  • रात्री अचानक जाग येणे किंवा झोप मोडणे
  • दिवसा झोप काढण्याची किंवा डूलकी घेण्याची इच्छा होणे
  • टिव्ही किंवा गाणी लावल्यावरच झोप येणे
  • दिवसभर जागे राहण्यासाठी कॅफेन सारख्या उत्तेडक पदार्थांच सेवन करणे
  • झोपेत घोरणे किंवा श्वसणाचा आवाज येणे

30 मिनिटं 'मॉर्निंग वॉक' करुन अनेक आजारांना ठेवा दूर, जाणून घ्या जबरदस्त फायदे

निद्रा विकाराचे (sleep disorder) निदान –

झोपेच्या समस्येच निदान करण्यासाठी एक डायरी घेऊण त्यात झोपेचं नियोजन बनवा. झोपण्याची आणि झोपेतून उठण्याची वेळ निश्चित करा. स्लीप पॅटर्ण बनवा. झोपेला प्रभावित करणारे घटक जसे कॅफेन, व्यायाम, दारू या गोष्टींना ट्रॅक करा व डायरीत नमूद करा. जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे जाल तेव्हा डॉक्टर तुम्हाला रोजच्या जीवनासंबधी प्रश्न विचारतील तेव्हा तुम्ही या गोष्टी सांगू शकता.

निद्रा विकाराचे कारण

नाक आणि साइनस ची सूज, दमा, हाय ब्लड प्रेशर, पार्किंसंस संबधी आजार, क्लिनिकल डिप्रेशन, चिंता, खराब स्लीप पैटर्न,खराब लाइफस्टाइल, अत्याधिक तणाव, खराब आहार असी काही कारण आहेत जी तुम्हाला स्लीप डिसऑर्डर चं शिकार बनवते.

निद्रा विकाराचे चे प्रकार 

स्लीप डिसॉर्डर देखिल अनेक प्रकारचे असतात जसे अनिद्रा (Insomnia), रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (Restless Legs Syndrome), स्लीप एप्निया (Sleep Apnea),  नार्कोलेप्सी(Narcolepsy), सर्केडियन रिदम स्लीप डिसऑर्डर (Circadian Rhythm Sleep Disorder). क्लेन-लेविन सिंड्रोम (Kleine-Levin Syndrome) आणि इडियोपैथिक हाइपरसोमनिया (Idiopathic Hypersomnia). आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ कि जर तुम्हाला यातील कोणतीही लक्षण जाणवत असतील तर लगेच संबधीत डॉक्टरशी संपर्क साधा जेणेकरूण पुढे उद्भवणाऱ्या समस्या रोखू शकतील.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य ज्ञानाच्या आधारे दिलेल्या आहेत. यावर अंमलबजावनी करण्याधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle