जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण

चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण

चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण

एखाद्या चित्रपटात काम करताना कलाकारांना फक्त अभिनयच नव्हे तर आपल्या शरीरावरही प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्या-त्या भूमिकेत शोभून दिसण्यासाठी कलाकार रात्रंदिवस मेहनत घेत असतात.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 सप्टेंबर-   एखाद्या चित्रपटात काम करताना कलाकारांना फक्त अभिनयच नव्हे तर आपल्या शरीरावरही प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्या-त्या भूमिकेत शोभून दिसण्यासाठी कलाकार रात्रंदिवस मेहनत घेत असतात. भूमिकेनुसार कलाकरांना कधी वजन वाढवावं लागत तर कधी वजन कमी करावं लागतं. यासाठी कलाकारांना बराच वेळ द्यावा लागतो. बॉलिवूडमध्येसुद्धा असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी नेहमीच आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा असाच एक स्टार आहे जो आपल्या प्रत्येक चित्रपटात सर्वोत्तम देण्यासाठी ओळखला जातो. ‘सरबजीत’मधील आपल्या दमदार अभिनयानंतर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या तो आपल्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित बायोपिक) या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटासाठी तो त्याच्या लुक आणि वजनवरही खूप मेहनत घेत आहे.नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. परंतु पहिल्या नजरेत त्याला ओळखणंही अनेकांना कठीण झालं होतं.

News18

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा फोटो पाहून रणदीप हुड्डा त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच रणदीपने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या ट्रान्सफॉर्मेशनची झलक दाखवताना दिसून आला. या फोटोमध्ये एका लिफ्टमध्ये उभा असलेला दिसून आला. यामध्ये त्याने टोपी आणि गॉगलही घातला होता. अभिनेत्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘आपल्या सर्वांनाच कधी-कधी एका लिफ्टची गरज असते’. **(हे वाचा:** Celebes Education:क्रिती सेननला ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर; अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री ) सुरुवातीला या चित्रपटासाठी रणदीपने 10  किलो वजन कमी केल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आता सांगण्यात येत आहे की, अभिनेत्याने आपल्या भूमिकेसाठी पुन्हा जवळपास 8  किलो वजन कमी केलं आहे. म्हणजेच रणदीपने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एकूण 18 किलो वजन कमी केलं आहे. याआधीही ‘सरबजीत’साठी अभिनेत्याने वजन कमी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात