जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Brain Health: मेंदुच्या प्रक्रियेवर परिणाम करतात हे पदार्थ; आहारातील प्रमाण वेळीच करावं लागेल कमी

Brain Health: मेंदुच्या प्रक्रियेवर परिणाम करतात हे पदार्थ; आहारातील प्रमाण वेळीच करावं लागेल कमी

Brain Health: मेंदुच्या प्रक्रियेवर परिणाम करतात हे पदार्थ; आहारातील प्रमाण वेळीच करावं लागेल कमी

साखर आणि संतृप्त स्निग्ध पदार्थयुक्त (Saturated Fatty Acids) आहार आपल्या हिप्पोकॅम्पसची (मेंदूची एक जटिल किंवा गुंतागुंतीची संरचना) वर्तन बदलतो. म्हणूनच, मेंदूशी (brain working) संबंधित समस्या निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मार्च : एखाद्या व्यक्तीनं त्याच्या आहारात अयोग्य किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थांचा समावेश केला तर, त्याचा डोपामाइन आणि सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या संतुलनावर परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, साखर आणि संतृप्त स्निग्ध पदार्थयुक्त (Saturated Fatty Acids) आहार आपल्या हिप्पोकॅम्पसची (मेंदूची एक जटिल किंवा गुंतागुंतीची संरचना) वर्तन बदलतो. म्हणूनच, मेंदूशी (brain working) संबंधित समस्या निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. केक्स किंवा कुकीज - केक (Cake), कुकीज (Cookies), क्रॅकर्स आणि कोल्डड्रिंक्ससारखे साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ आपल्या मेंदूच्या वेस्टलाईनसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच तज्ज्ञांनी विशेषतः प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये असलेली साखर (Refined Sugar) कमी करण्याची शिफारस केली आहे. आपण त्याऐवजी फळं खाल्ल्यास आरोग्यासाठी अधिक चांगलं राहतं. जास्त प्रमाणात मीठ असलेले आहार - चिप्स, पिझ्झा (Pizza), सूप आणि प्रक्रिया केलेल्या मांसात सोडियमचं प्रमाण जास्त असतं. याच्या अधिक सेवनामुळं मेंदूच्या पेशींमध्ये टाऊ प्रथिनांची पातळी अस्थिर होऊ शकते. टाऊ प्रथिनांची वाढती पातळी स्मृतिभ्रंश (Dementia) या रोगास उत्तेजन देते. म्हणूनच, डॉक्टर जास्त मीठ खाण्याऐवजी मसाले किंवा हंगामी अन्न खाण्याची शिफारस करतात. हे वाचा -  कडाक्याच्या उन्हाळ्यातही रहाल एकमद फिट आणि हेल्दी; फक्त या गोष्टी जपा प्रक्रिया केलेलं मांस - अल्झायमरचा (Alzheimer) धोका टाळण्यासाठी प्रक्रिया केलेल्या मांसासह सर्व दाहक पदार्थांपासून दूर राहण्याची शिफारस आहारतज्ज्ञ करतात. मांसावर प्रक्रिया करताना त्यावर रासायनिक प्रक्रिया, जास्त मिठाचा वापर, धूर, ड्राय आणि कॅनिंग करणं असे अनेक टप्पे असतात. यामुळं याचा अतिवापर घातक ठरतो. हे वाचा -  कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो अल्कोहोल (Alcohol) - दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळं न्यूरोट्रांसमीटरचं संतुलन प्रभावित होऊ शकतं. याचा आपल्या मेंदूवर खूप विपरीत परिणाम होतो. सफेद ब्रेड किंवा तांदूळ- संशोधनानुसार, सफेद ब्रेड किंवा पांढऱ्या तांदळाचा जास्त वापर केल्यानं अल्झायमरची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना आनुवंशिकदृष्ट्या हा त्रास असतो, त्यांच्या बाबतीत अशी शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी हे पदार्थ जास्त खाणं टाळलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात