मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Summer Tips : कडाक्याच्या उन्हाळ्यातही राहाल एकमद फिट आणि हेल्दी; फक्त या गोष्टी जपा

Summer Tips : कडाक्याच्या उन्हाळ्यातही राहाल एकमद फिट आणि हेल्दी; फक्त या गोष्टी जपा

How to Stay Healthy in Summer: तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान बदललं की अनेकजण आजारी पडतात. उन्हाळ्यातही त्वचा, डोळे, पोटाशी संबंधित समस्या खूप वाढतात. दिवसा कडक उन्हात फिरल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचेवर टॅन यासारख्या समस्या निर्माण होतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 21 मार्च : उकाडा असह्य होऊ लागला आहे, आता कुठे मार्च महिना चालू असताना आतापासून कडक उन्हामुळे सर्वांचीच अवस्था दयनीय झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान बदललं की अनेकजण आजारी पडतात. उन्हाळ्यातही त्वचा, डोळे, पोटाशी संबंधित समस्या खूप वाढतात. दिवसा कडक उन्हात फिरल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचेवर टॅन यासारख्या समस्या निर्माण होतात. नोकरी-व्यवसाय, शाळा किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी प्रत्येकाला घराबाहेर पडावं लागतं. याकाळात थोडासा निष्काळजीपणा दाखवला तरी आपण आजारी पडू शकतो. उन्हाळ्यातही आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर येथे दिलेल्या सोप्या पद्धती आणि टिप्स (How to Stay Healthy in Summer) नक्की फॉलो करा. उन्हाळ्यात निरोगी राहण्याचे सोपे उपाय भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. दिवसभर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. द्रवपदार्थाचे सेवन चांगले ठेवा, त्यात नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचे सेवन करा. हे सर्व द्रव शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाही आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. तेलकट-मसालेदार पदार्थ खाऊ नका उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकस, पौष्टिक आणि साधे घरगुती अन्न खाणे. जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचन बिघडते. या ऋतूत हिरव्या भाज्या आणि फळे जरूर खा. खरबूज, काकडी, आंबा इत्यादी खा. जेवणात हलके तेल, मसाले घाला. उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी आंबा पन्ना, सत्तू, बेल सरबत, ताक, लस्सी प्या. दररोज व्यायाम करा काही लोक उष्णता वाढली म्हणून व्यायाम करणं थांबवतात. असं करू नका. सकाळी थंड वारे वाहत असताना उद्यानात, बागेत किंवा गच्चीवर जाऊन योग, ध्यान करा. शरीरात एनर्जी लेव्हल टिकून राहण्यासाठी हलका व्यायाम करा. कधी कधी उन्हाळ्यात सुस्तपणा जाणवतो. व्यायाम केल्यास आळस, थकवा, कमी ऊर्जा पातळी दूर होईल. कडक सूर्यप्रकाशात चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे टाळा. हे वाचा - अन्नाचा घास 32 वेळा चावला पाहिजे, पण पाण्याचं काय? पाणी गटागटा पिणं योग्य आहे का बाहेरून येताच थंड पाणी पिऊ नका काही लोक बाहेरून येताच फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाटलीतील थंड पाणी पितात. असं करणं चुकीचं आहे. शरीराची उष्णता जास्त असताना एकदम थंड पाणी प्यायल्यास त्यामुळे त्रास होतो. घसा खवखवणे, सर्दी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उन्हातून आल्यावर थंड पाणी पिणे. बाहेरून आल्यानंतर प्रथम एक ग्लास साधे पाणी प्या, नंतर एनर्जी ड्रिंक, ज्यूस, ताक, नारळ पाणी पिऊ शकता. हे वाचा - हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ही फळं खायला हवीत; आहेत अनेक फायदे कपडे बदला जर तुम्ही उन्हात चालत असाल तर तुमच्या कपड्यांना घाम येतो. घरी येऊन कपडे बदलायला हवे. घामाचे कपडे परिधान केल्याने त्वचेवर बॅक्टेरिया वाढू शकतात, त्यामुळे घामुळे, फोड, पुरळ यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Lifestyle, Summer, Summer hot

पुढील बातम्या