Home /News /heatlh /

Peanut Benefits : भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने 'या' घातक आजाराचा धोका होईल कमी

Peanut Benefits : भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने 'या' घातक आजाराचा धोका होईल कमी

जेव्हा कधी आपण प्रवासात असताना किंवा घरी निवांत असताना भुईमुगाच्या शेंगा (Peanut) खाणं पसंत करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की याच भूईमुगाच्या शेंगा खाण्याची (Peanut Benefit) सवय तुम्हाला एका मोठ्या आजारापासून वाचवू शकते.

    दिल्ली, 13 सप्टेंबर : जेव्हा कधी आपण प्रवासात असताना किंवा घरी निवांत असताना भुईमुगाच्या शेंगा (Peanut) खाणं पसंत करतो. अनेक लोकांना या शेंगा काम करत असतानाही हव्या असतात, पण तुम्हाला माहिती आहे का की याच भुईमुगाच्या शेंगा खाण्याची (Peanut Benefit) सवय तुम्हाला एका मोठ्या आजारापासून वाचवू शकते. तर हा आजार नेमका कोणता आहे आणि त्यातून आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो, याची आपण माहिती घेणार आहोत. भुईमुगाच्या शेंगा खाण्याची सवय ही तुम्हाला ह्रदयविकाराच्या (heart disease) घातक आजारापासून वाचवू शकते. त्यासाठी फार भुईमुगाच्या शेंगा खाण्याची गरज नाही तर दररोज 4-5 शेंगा खाल्ल्या तरीही ते आरोग्याला पुरेसे आहे. ही माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनात जो व्यक्ती सातत्याने दररोज 4-5 भुईमुगाच्या शेंगा खातो त्याला इरतांच्या तुलनेत आजार होण्याची शक्यता कमी असते. असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. Life Partner : पार्टनरचा मूड खराब असेल वाद घालू नका, फक्त 'या' गोष्टी सांभाळा! त्याचबरोबर शेंगाचे सेवन हे आपल्या शरीराचे Ischemic Stroke या आजारापासूनही बचाव करते. त्यामुळे आता भूईमुगाच्या शेंगा या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे. या संशोधनाचे अध्ययन हे स्ट्रोक (Stroke) या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. भूईमुगाच्या शेंगांमध्ये ह्रदयविकाराला आळा घालण्याची क्षमता असते. त्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असल्याने त्याचा शरीराला फायदा होत आहे. शेंगांमधील मोनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड, पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड, मिनरल्स, विटामिन आणि फायबरचा समावेश असल्याने त्यातून शरीराला योग्य ती पोषकतत्वे मिळतात.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health Tips, Heart Attack, Tips for heart attack

    पुढील बातम्या