मुंबई, 15 ऑक्टोबर : महिला त्यांच्या प्रायव्हेट पार्टला कोणत्याही जंतूपासून सुरक्षित ठेवण्यास खूप महत्त्व देतात. अशा इंटिमेट स्वच्छतेसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी, योनीतून दुर्गंधी येऊ नये यासाठी आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक स्त्रिया याचा वापर खूप सहज करतात. करतात योनी आणि अंतर्गत भाग स्वच्छ करण्यास हे मदत करते असे त्यांना वाटते. पण खरोखर ही सर्व उत्पादने किती सुरक्षित आहेत? याचा वापर करणं आवश्यक आहे का? आणि याचा वापर केल्यास तो कसा करावा? याबद्दल आपल्याला सर्व माहिती असणे आवश्यक आहे. इंस्टाग्रामवर dr. cuterus या अकाउंटवर याविषयी माहिती दिली गेली आहे. जाणून घेऊया व्हजायनल वॉशबद्दल.
सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना महिलांनी ‘या’ चुका करणं टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसानस्वच्छतेसाठी व्हजायनल वॉश वापरणे आवश्यक आहे का? व्हजायनाची स्वच्छता राखणे आवश्यक असते. अन्यथा अनेक संसर्ग होण्याचा धोका संभवतो. व्हजायना स्वच्छ असेल तर आपल्या खाज, दुर्गंधी, इरिटेशन आणि रॅशेस अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे व्हजायना स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी व्हजायनल वॉशच वापरावे असे काही नाही. खरं तर योनीची स्वच्छता बाहेरूनच करणे योग्य असते आणि तेही केवळ पाण्याने.
व्हजायनल वॉश कसे वापरावे? व्हजायनल वॉश हे योनिमार्गाचे क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे एक सौम्य क्लींजर असते. मात्र काही स्त्रियांना याचा वापर कसा आणि कुठे करावा याबद्दल योग्य माहिती नसते. व्हजायनल वॉश हे डायरेक्ट व्हजायनावर वापरले जात नाही. व्हजायना हा आतील भाग असतो तर व्हल्व्हा हा बाहेरी भाग. हे व्हजायनल वॉश केवळ बाहेरच्या बाजूस वापरले जाते. आतमध्ये याचा वापर केल्यास अनेकदा इन्फेक्शन होण्याचीदेखील शक्यता असते.
व्हजायनल वॉश कसे असावे? इंटिमेट केअर प्रोडक्ट सौम्य आणि पीएच संतुलित असणे आवश्यक आहे. वॉश हे सल्फेट आणि पॅराबेन्सपासून मुक्त असले पाहिजेत, जे कोरडेपणा न आणता किंवा नैसर्गिक योनिमार्गाला बाधा न आणता हळूवारपणे स्वच्छ करता येईल. असे असायला हवे. जेणेकरून त्या भागाचे नैसर्गिक ph लेव्हल अनियंत्रित होणार नाही. पुरुषांना सहसा 5 - 5.5 pH शिल्लक असलेले उत्पादन आवश्यक असते आणि स्त्रियांना 3 - 3.5 आवश्यक असते.