मुंबई, 1 ऑक्टोबर : दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने कॉफी प्रेमींना एकत्र जमण्याचे आणि आपल्या आवडत्या पेयाची प्रशंसा करण्याचे आणखी एक कारण मिळते. तसेच ज्यांची उपजीविका केवळ कॉफीच्या लागवडीवर अवलंबून आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आधार देणे हा हा दिवस सजरा करण्याचा उद्देश आहे. हा दिवस साजरा करण्यामागे आणखी एक व्यापक उद्देश आहे. लोकांना या सुगंधित पेयाचे असंख्य फायदे माहित व्हावे आणि त्याच्या समृद्ध इतिहासाची जाणीव व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे तुम्हीही कॉफीचा कप हातात घ्या आणि आजच्या या कॉफी दिनाच्या निमित्ताने कॉफीचे घोट घेत कॉफी पिण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घ्या. हे आहेत कॉफी पिण्याचे फायदे एक कप कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर : कॉफीमुळे हृदयविकाराचा धोका तर कमी होतोच शिवाय यकृतासाठीही कॉफीत चांगली आहे असे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. 2016 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असेही म्हटले आहे की कॉफीच्या सेवनाने मल्टीपल स्क्लेरोसिसचा (MS) धोका कमी होतो.
शारीरिक कार्यक्षमता वाढवते : कॅफीनच्या सेवनाने तुमचा मेंदू ताबडतोब सजग होतो आणि तुमचे शरीर उत्साही आणि सक्रिय होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कॅफी महिलांची लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते.
Coffee Day : रोज या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात अनेक फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीरअँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : कॉफी हा अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे आणि हे अँटीऑक्सिडंट्स कर्करोगासारख्या अनेक प्राणघातक आजारांचा सामना करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जेव्हा तुम्हाला कामावर झोप येते तेव्हा एक कप कॉफी घेऊ शकता. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते : कॉफी पिण्याने केंद्रीय मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो, परिणामी मेंदू अधिक डोपामाइन तयार करतो ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. चरबी जाळण्यास मदत होते : प्रत्येक फॅट-बर्निंग सप्लिमेंटमध्ये कॅफिन आढळते. कारण हे अशा नैसर्गिक पदार्थांपैकी एक आहे जे पचनक्रियेचा दर वाढवते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस मदत करते. अत्यावश्यक पोषक घटक : अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त कॉफीमध्ये रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी2), पॅन्टोथेनिक ऍसिड (व्हिटॅमिन बी5); मॅंगनीज आणि पोटॅशियम; मॅग्नेशियम आणि नियासिन (व्हिटॅमिन बी3) हे पोषक घटक देखील आढळतात.
Eating Maggi while on diet : वजन घटवायचंय, पण डाएट करताना मॅगी खाल्ली तर चालेल काआनंदी ठेवण्याची ताकद : नैराश्य हा एक गंभीर मानसिक विकार आहे ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या कमी होते. एका अभ्यासानुसार कॉफीमुळे तुम्हाला नैराश्य येण्याचा धोका कमी होतो आणि आत्महत्येचा धोकाही कमी होतो.