Home /News /heatlh /

'Vitamin D' साठी शाकाहारी लोकांनी आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

'Vitamin D' साठी शाकाहारी लोकांनी आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोकूळ दुधाच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोकूळ दुधाच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. मात्र शाकाहारी लोकांना कशातून व्हिडॅमिन डी मिळणार?,जाणून घ्या!

    नवी दिल्ली, 15 जून : आपल्या निरोगी आरोग्यासाठी (Health) शरिराला व्हिटॅमिनची आवश्यकता असते. त्यामुळे पोष्टीक आहारातून व्हिटॅमिनचं भेटणं गरजेचं असतं. अशातच व्हिटॅमिन डी (Vitamin D) हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. हाडे, दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी या व्हिटॅमिन डी ची गरज असते. मांसांहारातून व्हिटॅमिन डी असलेल्या भरपूर गोष्टी मिळतील. मात्र शाकाहारी (Vegitarian)लोकांना कशातून व्हिडॅमिन डी मिळणार?, शाकाहारी  लोकदेखील काही गोष्टी सहज सेवन करू शकतात जेणेकरून त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही आणि ते आतून निरोगी राहू शकतील. दही -  दह्याचे सेवन केल्याने तुमचे शरीर आतून थंड होते आणि शरीराला हायड्रेट देखील ठेवते. यामध्ये भरपूर प्रथिने आणि कॅलरीज आढळतात.याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते. हे ही वाचा - घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर! संत्री -  संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता होत नाही. वाचा-व्यायाम न करताही करू शकता वजन कमी; खाण्याच्या या 5 चुकीच्या सवयी ताबडतोब सोडा दूध -  दूधात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते. दुधामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. यामध्ये प्रथिने आढळतात.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करू शकता. वाचा- टॅब्लेट्सच्या पाकिटांमध्ये असतात रिकामे शेल, काय आहे यामागचे कारण ? मशरुम -  मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. आपण ते सूप किंवा सॅलडच्या स्वरूपात आहारात समाविष्ट करू शकता. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भासत नाही.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Food, Health, Health Tips, Vitamin D

    पुढील बातम्या