मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Heart Disease : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी आवर्जून पाळा

Heart Disease : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी आवर्जून पाळा

heart diseases

heart diseases

हृदयविकाराचा विचार करता, दोन प्रकारे उपाययोजना करणं हितावह ठरतं. यातल्या काही उपाययोजना हृदयविकार टाळण्यासाठी करता येतात. काही उपाययोजना हृदयविकाराचं निदान झाल्यावर कराव्या लागतात. या दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांची माहिती जाणून घेऊ या.

पुढे वाचा ...
मुंबई, 01 ऑगस्ट : हृदयविकार गंभीर आणि जीवघेणा ठरू शकणारा आजार असला, तरी काही उपाययोजना, योग्य औषधोपचारांनी तो नियंत्रणात ठेवता येतो. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले ताण-तणाव, व्यसनं, अनियमित आणि चुकीचा आहार, बैठं काम, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता आदी गोष्टी हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्यासाठी (Heart Attack) कारणीभूत ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या गोष्टींमध्ये काही सकारात्मक बदल केल्यास हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळता येतो. तसंच हृदयविकाराचं निदान झाल्यावर घाबरून जाता, काही उपाययोजना काटेकोरपणे केल्यास संभाव्य धोके टळू शकतात. हृदयविकाराचा विचार करता, दोन प्रकारे उपाययोजना करणं हितावह ठरतं. यातल्या काही उपाययोजना हृदयविकार टाळण्यासाठी करता येतात. काही उपाययोजना हृदयविकाराचं निदान झाल्यावर कराव्या लागतात. या दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांची माहिती जाणून घेऊ या. हृदयविकार होऊ नये यासाठी या गोष्टी पाळणं आवश्यक धूम्रपान, तंबाखू सेवन टाळा : कोणत्याही स्वरूपाचं व्यसन हृदयविकाराला आमंत्रण देणारं ठरतं. त्यामुळे तंबाखूचा कोणत्याही स्वरूपात वापर टाळा. कारण तंबाखूमुळे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं. धूम्रपान सोडल्यानंतर मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. तंबाखूतली रसायनं हृदय आणि रक्तवाहिन्यांवर प्रतिकूल परिणाम करतात. धूम्रपानामुळे रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण  कमी होतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर  आणि हृदयाचे ठोके वाढतात. शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. हृदयविकाराची ही पहिली पायरी असते. त्यामुळे धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन टाळणं आवश्यक आहे. वजन नियंत्रणात ठेवा : अतिरिक्त वजन अनेक आजारांना आमंत्रण देणारं ठरतं. 10 लाख महिलांचा अभ्यास केला असता, त्यातून बॉडी-मास इंडेक्स (BMI) हा कोरोनरी हार्ट डिसीजसाठी जोखमीचा घटक ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वजन उंचीच्या प्रमाणात राहणं आवश्यक आहे. वजन नियंत्रणासाठी पुरेसा व्यायाम गरजेचा आहे. हेही वाचा - Types Of Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याचे प्रकार किती? कधी ठरू शकतो जीवघेणा? व्यायाम करा : हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी किंवा हृदयविकार नियंत्रणात राहण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम (Exercise) करणं आवश्यक आहे. व्यायामामुळे केवळ हृदयविकारच नाही तर डायबेटिस, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, ऑस्टिओपोरोसिस, कॅन्सर हे विकार दूर राहण्याची शक्यता वाढते. चांगल्या झोपेसाठी, ताण-तणाव कमी होण्यासाठी मूड चांगला राहण्यासाठीदेखील व्यायाम पूरक ठरतो. आठवड्यातून 150 मिनिटं चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो. तसंच आठवड्यातून 75 मिनिटं वेगानं चालणं हितावह ठरतं. हेल्दी डाएट घ्या : दररोज पोषक आहार घेतल्यास हृदय निरोगी राहतं. तसंच ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर या बाबी नियंत्रणात राहतात. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं, बीन्स, मासे, कमी फॅट्सचं मांस, कमी फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ, कडधान्यं, ऑलिव्ह ऑइलसारखे उपयुक्त फॅट्स असलेले पदार्थ समाविष्ट करावेत. मीठ, साखर, प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ, सॅच्युरेटेड फॅटस ,ट्रान्स फॅटयुक्त  पदार्थ कमी प्रमाणात खावेत. अल्कोहोल घेऊच नये किंवा घ्यायचंच असेल तर कमी प्रमाणात घ्यावं. पुरेशी झोप घ्या :  अपुरी आणि अशांत झोप लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा झटका, डिप्रेशन आणि डायबेटिसला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे प्रत्येक प्रौढ व्यक्तीनं रात्रीच्या वेळी किमान 7 तास झोप घेणं आवश्यक आहे. ताण-तणावांचं व्यवस्थापन (Stress Management) आवश्यक : सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव वाढत असून, त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढत आहे. ताण-तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी योगासनं, मेडिटेशन, छंद जोपासणं आदी गोष्टी करू शकता. हेही वाचा - Brain health care : मेंदूसाठी घातक आहेत या 5 गोष्टी; आजपासूनच आहारात न घेतलेले बरे हृदयविकाराचं निदान झाल्यानंतर या उपाययोजना आवश्यक - तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं जीवनशैलीत योग्य तो बदल करावा आणि योग्य व्यायामाचा समावेश करावा. - हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) हृदयासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळे नियमित ब्लड प्रेशर तपासणी करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉलची तपासणी करणंदेखील आवश्यक आहे. - हृदयविकार नियंत्रणात राहण्यासाठी विशिष्ट कालावधीत टाइप-2 डायबेटिसच्या (Diabetes Type-2) अनुषंगानं तपासण्या करणं आवश्यक आहे. त्यातही कौटुंबिक पार्श्वभूमी डायबेटिसची असेल तर या गोष्टीकडं कटाक्षानं लक्ष द्यावं. - हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली असेल तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी दिलेली औषधं नियमितपणे घ्यावीत. - हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आल्यानंतर किंवा अॅंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यावरची औषधं घेणं, वजन जास्त असल्यास ते कमी करणं, धूम्रपान सोडणं, हेल्दी डाएट घेणं आवश्यक आहे. या गोष्टी केल्यानं हृदयविकाराचा दुसरा झटका येणं, हृदयविकार अधिक गंभीर होणं टाळता येतं. एक झटका येऊन गेल्यानंतर दुसरा झटका रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. एकूणच जीवनशैली, आहारात सकारात्मक बदल, लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करणं, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं, औषधं (Medicines) नियमित घेणं, व्यसन टाळणं या गोष्टी हृदयविकाराला दूर ठेवण्यास मदत करतात.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:

Tags: Health, Heart Attack, Tips for heart attack

पुढील बातम्या