नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 9 फेब्रुवारी : प्रसुतीच्या दरम्यान महिलांना शरिरातील विविध बदलांना सामोरं जावं लागतं. यामधील काही बदल हे बाळाच्या जन्मानंतर पूर्ववत होतात. तर काही बदलांच्या खुणा या कायमस्वरुपी राहतात. यापैकी एक महत्त्वाची खूण म्हणजे स्ट्रेच मार्क. गर्भवती महिलांना स्ट्रेच मार्क मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या स्ट्रेचमार्कवर काय उपाय करावेत याविषयी पुण्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी टिप्स दिल्या आहेत.
काय काळजी घ्याल?
गर्भधारणेच्या काळात स्ट्रेच मार्क येणं हे सामान्य गोष्ट आहे. याचा रंग पांढरा, लाल किंवा काळा असतो. महिलांना छाती, पाठ किंवा कंबरेवर स्ट्रेचमार्क दिसतात. पोटातील बाळ वाढत असते त्यावेळेस शरीराचा आकार देखील वाढत असतो. त्याकाळात गर्भवती महिलांची त्वचा ताणली जाते आणि मोठ्या प्रमाणावर स्ट्रेच मार्क पडतात.
Live-in Relationship बाबत A to Z माहिती, सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं! पाहा Video
स्ट्रेच मार्क कमीत कमी करण्यासाठी काही उपाय आहत. गर्भावस्थेच्या दरम्यान योग्य व्यायाम आवश्यक आहे. शरीरातील त्वचेला व्यायाम मिळून स्ट्रेच मार्क कमी होतील. त्यासोबतच आहाराचे देखील योग्य नियोजन करणे गरजेचे असते. गर्भधारणेच्या दरम्यान कमीत कमी चार लिटर रोज पाणी प्यावे.
स्ट्रेच मार्क हे त्वचा कोरडी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. यामुळे त्वचा कोरडी राहू नये यासाठी विटामिन ई असलेले बॉडी लोशन किंवा नारळ तेल शरीराला लावू शकता. त्यासोबतच चहा कॉफी सारख्या पदार्थांचे कमीत कमी सेवन केले पाहिजे. या पदार्थांमुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता दिसून येते. आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करावा. त्यासोबतच रसदार फळे देखील या कालावधीमध्ये खावेत.
स्ट्रेच मार्कमुळे अनेकदा आपल्या त्वचेला खाज सुटते. तर अशावेळी जर खाजवल्यास मोठ्या प्रमाणावर स्ट्रेच मार्क पडतात. त्याऐवजी आपल्याजवळ एक नेहमी कापूस ठेवावा. त्या कापसाने फक्त स्ट्रेच मार्कवरती हात फिरवावा यामुळे स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत होते,' अशी माहिती डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.