मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

भूक लागत नाही, भूक मंदावलीय? नक्की करून पहा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

भूक लागत नाही, भूक मंदावलीय? नक्की करून पहा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

भूक वाढवण्याचे उपाय

भूक वाढवण्याचे उपाय

भूक न लागण्याची समस्या अनेकांना सतावते. कमी खाल्ले गेल्याने नंतर अशक्तपणाचा त्रास होऊ शकतो. नियमित चांगली भूक लागणं हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 27 नोव्हेंबर : अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल, की सध्या भूकच लागत नाही. जेव्हा लागते तेव्हा जास्त खावं वाटत नाही. ही समस्याच आजच्या धावपळीच्या काळात अनेकांमध्ये दिसते. तुम्हालाही जाणवते का ही समस्या? यात भूक संपते. मग अशक्तपणाही जाणवू लागतो. जाणून घ्या यावर मात करण्याचे काही घरगुती उपाय. यातून भूक नक्कीच वाढेल.

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. याला मुख्यतः बद्धकोष्ठता दूर करण्यास वापरलं जातं. तुम्हाला वेळेवर भूक लागत नसल्यास त्रिफळा चूर्ण वापरा. हलक्या गरम दुधात एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून घ्या. हे नियमित घेतल्याने भूक वाढते. (remedies for appetite problem)

ग्रीन टी घ्या

ग्रीन टी भूक वाढवण्यास प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनाने केवळ भूक वाढते असे नाही तर अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तुम्हाला सकाळ-संध्याकाळ चहा आवडत असल्यास इतर कुठला चहा पिण्याऐवजी ग्रीन टी घ्या. (how to increase appetite)

लिंबू पाणी

उन्हाळा असो, की हिवाळा, पाणी भरपूर पिलं पाहिजे. शरीराला प्रत्येक ऋतूत पाण्याची गरज असते. लिंबू पाणीही घेतलं पाहिजे. यानं भूक वाढते. शिवाय शरीरातील पाण्याची कमतरताही भरून निघते. (juice for appetite)

ओवा

ओवा खाल्ल्यानं पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत ओवा खाऊ शकता. यानं पोटही साफ राहतं. याला हलकं भाजून यात मीठ टाकून खा. दिवसातून दोन वेळा खाऊ शकता. (green tea for appetite)

हे वाचा - जोडीदाराकडून या 5 अपेक्षा ठेवणं योग्य नाही; सुखी संसाराचा होऊ शकतो अंत

ज्यूस

तुम्हाला भूक लागत नसल्यास आणि काहीच खावं वाटत नसल्यास ज्यूस पिऊ शकता. ज्यूस पिताना यात थोडं मीठ किंवा काळं मीठ टाका. यानं पोट साफ राहील आणि भूकही लागेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Food, Health Tips, Home remedies