मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Happy Life: जोडीदाराकडून या 5 अपेक्षा ठेवणं योग्य नाही; सुखी संसाराचा होऊ शकतो अंत

Happy Life: जोडीदाराकडून या 5 अपेक्षा ठेवणं योग्य नाही; सुखी संसाराचा होऊ शकतो अंत

नातेसंबंध चांगले राहण्याचे उपाय

नातेसंबंध चांगले राहण्याचे उपाय

अनेकवेळा प्रत्येक बाबतीत अधिक अपेक्षा ठेवल्यानं नात्यात दुरावा येतो. यामुळे नातेसंबंध तुटतात. जाणून घेऊया अशा कोणत्या 5 अपेक्षा आहेत, ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : दोन्ही बाजूंनी एकमेकांबद्दल समान प्रेम, प्रामाणिकपणा, आदर आणि विश्वास असेल तोपर्यंतच नातेसंबंध चांगले टिकू शकतात. नाते पती-पत्नीचे असो, प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा मित्रांचे असो, प्रत्येक नात्यात एकमेकांकडून काही ना काही अपेक्षा असतातच. प्रत्येक पाऊल सोबत टाकणं, एकमेकांना साथ देणे, सुख-दु:ख वाटून घेणे ही अपेक्षा असते, पण नात्यात अनेकवेळा प्रत्येक बाबतीत अधिक अपेक्षा ठेवल्यानं नात्यात दुरावा येतो. यामुळे नातेसंबंध तुटतात. जाणून घेऊया अशा कोणत्या 5 अपेक्षा आहेत, ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

अपेक्षा ज्या आनंदी नातेसंबंध तोडू शकतात

हे ही वाचा : विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं

1. thestatesman.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, जेव्हा तुम्ही तुमचा लाइफ पार्टनर परफेक्ट असण्याची अपेक्षा करता, तेव्हा ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला दुखवू शकते. त्यामुळे त्यांना असे वाटू शकते की, ते परिपूर्ण नाहीत. त्यांच्यात काही दोष किंवा कमतरता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगात कोणीही परिपूर्ण नाही. परिपूर्णतेची अपेक्षा धरून राहिल्याने निराशा आणि संतापच होईल. परिपूर्णतेची अपेक्षा करण्याऐवजी आपल्या जोडीदारावर प्रेम करायला शिका. ते जसे आहेत तसे स्वीकारा. त्यांचा ज्या कामात रस आहे तेच चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करा. ती व्यक्ती ज्यात कमी आहे ती कामं इतर लोकांकडून करवून घेणे उत्तम ठरेल.

2. असे काही लोक असतात जे नेहमी आपल्या जोडीदाराने व्यवस्थित काम करण्याची अपेक्षा करतात. छोटीशी चूकही त्यांना सहन होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की चुका माणसाकडूनच होतात. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला त्याची चूक सुधारण्याची संधी द्या, त्याच गोष्टीवर सतत बोलत राहू नका. या उलट, असे काही लोक असतात जे प्रत्येक कामात स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांची चूक झाली तरी चालेल. अशा गोष्टी रोज घडू लागल्या की नात्यात प्रेम कमी होते, कटुता जास्त येते.

3 एका संशोधनानुसार, जी जोडपी प्रत्येक गोष्टीवर एकमेकांशी सहमत असतात, त्यांच्यात घटस्फोट होण्याची शक्यता असे न करणाऱ्या जोडप्यांपेक्षा जास्त असते. असे घडण्याचे कारण म्हणजे आपण अपेक्षा करतो की, आपल्या जोडीदाराने नेहमी आपल्याशी सहमत व्हावे, तेव्हा याचा अर्थ असा होतो की, आपण त्यांच्या मताला तितके महत्त्व देत नाही, जितके महत्त्व आपल्या मताला देतो. असे करणे कोणत्याही नात्यासाठी हेल्दी नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुमच्यात वाद होतात तेव्हा त्यांना तुमच्याशी सहमत होण्यासाठी रागावण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकता.

4. असे काही लोक असतात ज्यांना आपल्या मनात काय चालले आहे, ते जोडीदाराने जाणावे आणि समजून घ्यावे, असे वाटते. पण, कोणाच्या मनात काय चाललं आहे, ते समजणं प्रत्येकवेळीच अशक्य आहे. तुमच्या मनात काय चालले आहे हे तुमच्या जोडीदाराला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला त्यांच्याशी थेट बोलावे लागेल. असे न केल्याने, आपण फक्त आपलेच नुकसान कराल. जोडीदाराकडून ही अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

5. काही लोकांना असे वाटते की, आपला जीवनसाथी प्रत्येक परिस्थितीत आनंदी असावा. जीवनात आणि नातेसंबंधात कधी कधी चढ-उतार येतात आणि अशा परिस्थितीत आनंदी राहणे थोडे कठीण होते, हे स्वीकारण्याचा प्रयत्न करा. रिलेशनशिपमध्ये असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी आनंदी राहाल. असे काही लोक असतात जे आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्टीवर रात्रंदिवस टोमणे मारतात आणि त्यांची अपेक्षा असते की त्याने शांत आणि आनंदी राहून सर्व काही सहन करावे, असे करणे देखील योग्य नाही, यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

हे वाचा - शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी का खाऊ नये? जाणून घ्या

तुमचे नाते तुटू नये असे वाटत असेल तर नेहमी एकमेकांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. संबंध मजबूत करण्यासाठी, त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नवीन नातेसंबंधात प्रवेश करणार असाल किंवा विद्यमान नातेसंबंध टिकवून ठेवू इच्छित असाल तरीही, विश्वास निर्माण करण्यासाठी आणि चिरस्थायी आनंदासाठी वास्तववादी अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Relation, Relationship tips