मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या 5 भाज्या आहेत सर्वोत्तम; आहारात घ्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या 5 भाज्या आहेत सर्वोत्तम; आहारात घ्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा, याविषयी जाणून (Best Vegetables For Blood Sugar) घेऊया.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा, याविषयी जाणून (Best Vegetables For Blood Sugar) घेऊया.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा, याविषयी जाणून (Best Vegetables For Blood Sugar) घेऊया.

    मुंबई, 08 ऑगस्ट : प्रत्येक भाजीची स्वतःची अशी खास गुणवत्ता असते. आपल्या आरोग्यासाठी या भाज्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असते, तेव्हा काही भाज्या त्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. eatdis.com च्या माहितीनुसार, बहुतेक भाज्यांमध्ये उच्च फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आढळतात, ज्यामुळे साखरेची पातळी खराब होत नाही. पण, काही भाज्या अशा आहेत, ज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानल्या जातात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा, याविषयी जाणून (Best Vegetables For Blood Sugar) घेऊया. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम 5 भाज्या ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये उच्च फायबर आढळते, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एवढेच नाही तर ब्रोकोली प्रोबायोटिकप्रमाणे कार्य करते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय इतर भाज्यांच्या तुलनेत यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी असते. लेट्युस आणि मिक्स ग्रीन - जर तुम्हाला तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात मिक्‍स ग्रीन आणि लेटस सॅलडचा समावेश करा. उच्च फॉलिक, फायबर, व्हिटॅमिन के सोबतच यामध्ये व्हिटॅमिन के देखील आढळते, जे रक्त गोठणे, मधुमेह आणि इन्सुलिनची समस्या नियंत्रित ठेवते. पालक - जर तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल, तर आहारात पालकचा अवश्य समावेश करा. जर तुम्ही कच्च्या पालकाचे सेवन केले तर त्यात असलेले व्हिटॅमिन के, फॉलिक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम आणि प्रोटीनमुळे कार्बचे शोषण कमी होते. अशाप्रकारे, साखरेची समस्या दूर करण्यात खूप मदत होते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर वांगी - गडद जांभळ्या रंगाची वांग्याची भाजी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले फायबर आणि प्रोटीन रक्तातील कार्ब्सचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा फुलकोबी कोबीच्या मदतीने आपण रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करू शकतो. फुलकोबी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन केचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या