मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weak Grip Of Hands : तुमच्या हाताची पकड कमकुवत होतेय का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Weak Grip Of Hands : तुमच्या हाताची पकड कमकुवत होतेय का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

तुमच्या हातांची पकड कमकुवत होत असेल, तुम्हाला घट्ट बंद झालेली भांड्यांची झाकणं उघडण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

तुमच्या हातांची पकड कमकुवत होत असेल, तुम्हाला घट्ट बंद झालेली भांड्यांची झाकणं उघडण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

तुमच्या हातांची पकड कमकुवत होत असेल, तुम्हाला घट्ट बंद झालेली भांड्यांची झाकणं उघडण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 13 ऑगस्ट : तुम्हाला रोजची कामे करताना अस्वस्थ वाटत असेल तर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या शरीरात वाढणाऱ्या एखाद्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. तुमच्या हातांची पकड कमकुवत होत असेल, तुम्हाला घट्ट बंद झालेली भांड्यांची झाकणं उघडण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. एका अभ्यासानुसार ज्या लोकांची हाताची पकड कमकुवत झाली असेल त्यांना हृदयविकार, कर्करोगासह इतर गंभीर आजारांचा धोका असू शकतो. हाताची पकडीत कमकुवत होण्यावर संशोधन अमर उजालाच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रियास्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टीम अॅनालिसिसच्या शास्त्रज्ञांनी हाताच्या पकडीची ताकद आणि त्या आधारे शरीरात रोग निर्माण होण्याचा धोका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हातांची कमकुवत पकड वय, लिंग आणि लांबी यावर अवलंबून असते आणि तुम्हाला अशी समस्या येत असेल तर खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे असे सांगितले. शास्त्रज्ञांच्या मते, तुमच्या समान वयोगटातील इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला हाताच्या पकडीत कमकुवतपणा येत असेल तर ते गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीचे लक्षण असू शकते.

तुम्ही सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहात का? डॉक्टरांनी असे प्रश्न विचारले तर महिलांनो अजिबात लाजू नका, अन्यथा...

हाताची पकड कमकुवत असेल तर कोणत्या रोगांचा धोका? समान वयाच्या आणि लिंगाच्या लोकांच्या तुलनेत तुमची पकड कमकुवत असेल तर ते हृदयविकाराच्या समस्यांचे लक्षण मानले जाऊ शकते. हे हार्ट फेल्युअर आणि हृदयाच्या सामान्य कार्यांमधील समस्यांचे लक्षण देखील मानले जाऊ शकते. या अभ्यासात असे आढळून आले की कमकुवत पकड असलेल्या लोकांमध्ये प्रोस्टेट, फुफ्फुस, स्तन आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो. यापूर्वी ब्रिस्टल विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढलून आले होते की, ज्या लोकांची हाताची पकड मजबूत आहे त्यांना अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो. Pregnancy Diet & Precautions : प्रेग्नेंट झाल्यावर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा बाळावर होईल गंभीर परिणाम संशोधक काय म्हणतात? विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते, ज्या लोकांना टाइप-2 मधुमेह किंवा लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांची पकड कालांतराने कमकुवत होते. मज्जातंतूंच्या कार्यक्षमतेवर बरेच काही अवलंबून असते. कमकुवत पकड हे हाताच्या समस्या किंवा दुखापतींसारख्या कारणांमुळे देखील असू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी काळजी करण्याची गरज नाही. परंतु स्वत: ची पकड तपासल्यास तुम्हाला शरीरातील समस्यांची निश्चितपणे कल्पना येऊ शकते.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tips for heart attack

पुढील बातम्या