मराठी बातम्या /बातम्या /heatlh /एक्सरसाइज करताना चक्कर येतेय? ही असू शकतात महत्त्वाची कारणं

एक्सरसाइज करताना चक्कर येतेय? ही असू शकतात महत्त्वाची कारणं

काही लोकांना व्यायाम करताना किंवा नंतर खूप थकवा येतो आणि चक्कर येते. काही व्यक्ती तर बेशुद्धही होतात. कधीतरी अशी घटना घडली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण वारंवार दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं.

काही लोकांना व्यायाम करताना किंवा नंतर खूप थकवा येतो आणि चक्कर येते. काही व्यक्ती तर बेशुद्धही होतात. कधीतरी अशी घटना घडली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण वारंवार दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं.

काही लोकांना व्यायाम करताना किंवा नंतर खूप थकवा येतो आणि चक्कर येते. काही व्यक्ती तर बेशुद्धही होतात. कधीतरी अशी घटना घडली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण वारंवार दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Lanja, India

  नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांचं आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लठ्ठपणाच्या समस्येमुळे डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, किडनीचे आजार, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक अशा अनेक आजारांचा धोकाही वाढत आहे. यामुळे अनेकांचं अकाली मृत्यू झाल्याच्याही घटना तुमच्या कानावर आल्या असतील. अशा परिस्थितीतीमुळे फिटनेसवर लक्ष देणं अतिशय गरजेचं ठरत आहे. निरोगी जीवनासाठी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. याचा आपल्या शरीराला अनेकप्रकारे फायदा होतो; पण काही लोकांना व्यायाम करताना किंवा नंतर खूप थकवा येतो आणि चक्कर येते. काही व्यक्ती तर बेशुद्धही होतात. कधीतरी अशी घटना घडली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण वारंवार दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं.

  वर्कआउट दरम्यान चक्कर येणं किंवा बेशुद्ध होणं, हे अनेक रोगांचं लक्षण असू शकतं. जर डिहायड्रेशन झालं असेल तर वर्कआउट करताना चक्कर येणं सामान्य गोष्ट आहे. पण, कधीकधी याला इतर गोष्टीही कारणीभूत असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे वर्कआउट करताना चक्कर येऊ शकते.

  वर्कआउट करताना चक्कर येण्याची कारणं

  डिहायड्रेशन - डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, व्यायामादरम्यान शरीराला पाण्याची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत जर पुरेसं पाणी शरीराला मिळालं नाही तर पाण्याअभावी बेशुद्ध होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे वर्कआउट करताना पुरेसं पाणी किंवा लिक्विड पदार्थ प्यायले पाहिजेत.

  ब्लड शुगर कमी होणं - जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीराला अतिरिक्त साखरेची गरज असते. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी जेवणात साखरयुक्त पदार्थांचं सेवन करावं. असे पदार्थ शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. त्यामुळे वर्कआउटदरम्यान चक्कर येण्याचा धोका कमी होतो.

  कठीण वर्कआउट - वर्कआउटदरम्यान, खूप जास्त एक्सरसाइजमुळे चक्कर येऊ शकते. जेव्हा शरीरावर अचानक जास्त ताण येतो तेव्हा आपण बेशुद्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्कआउट करताना शरीरावर प्रमाणापेक्षा जास्त ताण येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

  ब्लड प्रेशर कमी होणं - काहीवेळा लो ब्लड प्रेशरमुळे वर्कआउट करताना चक्कर येण्याच्या किंवा बेशुद्ध होण्याच्या घटना घडू शकतात. जर एखाद्याला लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यानं जास्त कठीण व्यायाम करू नये.

  हे वाचा - वेट लॉस डाएटमध्ये सामील करा ग्लूटेन फ्री धान्य, पोटभर खाऊनही वजन राहील नियंत्रित

  इतर गुंतागुंत - एखादा गंभीर आजार असताना व्यायाम केल्यास चक्कर येणं स्वाभाविक आहे. अंगात ताप असला तरी वर्कआउट करताना चक्कर येऊ शकते. याशिवाय, टीबी, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांदरम्यान व्यक्ती व्यायाम करताना बेशुद्ध पडू शकते.

  एकूणच, एखादी व्यक्ती वर्कआउट करताना वारंवार बेशुद्ध होत असेल किंवा तिला चक्कर येत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अशा व्यक्तीला कदाचित वरील कारणांतील एखाद्या कारणामुळे चक्कर येत असावी.

  First published:
  top videos

   Tags: Health Tips, Types of exercise