न्यूयॉर्क, 24 जानेवारी: उतारवयात (
Old age) जर कुठलंही काम केल्यानंतर (
Work) थकवा (
Fatigue) जाणवत असेल, तर पुढील 2 ते 3 वर्षांत (
2 to 3 years) मृत्यू (
Death) येण्याची दाट शक्यता असल्याचं नव्या अभ्यासातून समोर आलं आहे. उतारवयात थकवा किती येतो, हे पाहून माणसाचं उर्वरित आयुर्मान किती असेल, याचा अंदाज घेता येऊ शकतो, असं नव्या संशोधनात दिसून आलं आहे. विविध ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली असून नागरिकांनी उतारवयात सातत्यानं व्यायाम करणं आणि योग्य आहार घेणं हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असल्याचं या संशोधनातूनही अधोरेखित झालं आहे.
काय आहे संशोधन?
ज्या नागरिकांना उतारवयात कुठलंही काम केल्यावर थकवा येतो, त्या नागरिकांचा इतरांच्या तुलनेत पुढील 2.7 वर्षांत मृत्यू होण्याची शक्यता असते, असं नवं संशोधन म्हणतं. ज्या नागरिकांचा फटिगॅबिलीटी म्हणजे थकण्याचा स्कोअर जास्त आहे, त्यांचा मृत्यू हा कमी स्कोअर असणाऱ्यांच्या तुलनेत लवकर होत असल्याचं दिसून आलं आहे.
असं झालं संशोधन
लाँग लाईफ फॅमिली स्टडी या अभ्यासात 60 वर्ष वयापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या 2906 नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. कुठलंही काम केल्यावर आपल्याला किती थकवा येतो, याबाबत नागरिकांना स्वतःलाच 1 ते 5 या दरम्यान गुण देण्यात सांगण्यात आले होते. संथ गतीनं चालणं, जलद गतीनं चालणं, घरातील कामे करणे आणि बागेतील कष्टाची कामे करणे अशा स्वरुपाची कामे त्यांना देण्यात आली होती.
असा होता निष्कर्ष
या प्रयोगात ज्या नागरिकांना 25 किंवा त्याहून जास्त मार्क्स मिळाले, त्यांच्या मरण पावण्याचं प्रमाण हे 25 पेक्षा कमी मार्क्स मिळालेल्यांपेक्षा 2.3 पट अधिक असल्याचं आणि 2.7 वर्षं लवकर मृत्यू येत असल्याचं या संशोधनातून दिसून आलं.
हे वाचा-
अमेरिकेनं Ukraine मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना बोलावलं परत, धाडणार सैनिक
व्यायाम करा, थकवा टाळा
थकवा येणं, ही शारीरिक क्षमता कमी होत चालल्याचं लक्षण असल्याचं दिसून आलं आहे. उतारवयात फिटनेस टिकवण्यासाठी दैनंदिन व्यायाम करणं आणि उत्तम आहार घेणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.