मराठी बातम्या /बातम्या /विदेश /युद्धाची तयारी? अमेरिकेनं Ukraine मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना बोलावलं परत, धाडणार मोठा फौजफाटा

युद्धाची तयारी? अमेरिकेनं Ukraine मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना बोलावलं परत, धाडणार मोठा फौजफाटा

युक्रेनमधली अमेरिकी डिप्लोमॅट्सच्या कुुटंबीयांनी तातडीनं अमेरिकेत परतावं, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं दिली आहे.

युक्रेनमधली अमेरिकी डिप्लोमॅट्सच्या कुुटंबीयांनी तातडीनं अमेरिकेत परतावं, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं दिली आहे.

युक्रेनमधली अमेरिकी डिप्लोमॅट्सच्या कुुटंबीयांनी तातडीनं अमेरिकेत परतावं, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं दिली आहे.

वॉशिंग्टन, 24 जानेवारी: युक्रेन (Ukraine) प्रश्नावरून अमेरिका (America) आणि रशियातील (Russia) तणाव (Tension) कमालीचा वाढला आहे. युक्रेनमधील सर्व डिप्लोमॅटच्या कुटुंबीयांनी (Families of diplomats) तातडीनं देश सोडून अमेरिकेत परतावं, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. रशियानं युक्रेनच्या सीमेवर सैन्य वाढवल्यानंतर अमेरिकेनंही शस्त्रास्त्रांचा मोठा साठा युक्रेनमध्ये पाठवून दिला आहे. रशिया युक्रेन प्रश्नावरून अधिकाधिक आक्रमक होत असल्याचं दिसल्यामुळेच अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट असून युक्रेनमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

यासाठी दिला आदेश

रशियानं गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या सीमेवर 1 लाखांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत. रशियाची क्षमता लक्षात घेता, जर युक्रेनमध्ये सैन्य घुसवण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिकी नागरिकांची तातडीनं सुरक्षा करणं आणि त्यांना देशातून बाहेर काढणं अवघड जाईल, याचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं अमेरिकी प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

अधिक फौजफाटा

रशियाची युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पाहता युक्रेनला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचा दावा अमेरिकनं केला आहे. त्यासाठी अमेरिकेनं मोठा शस्त्रसाठा युक्रेनमध्ये पाठवला होता. त्यानंतर आता अमेरिकी फौजादेखील युक्रेनमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

पपेट सरकार

रशियाकडून युक्रेनमधील विद्यमान सरकार उलथवून टाकून रशिया समर्थक सरकार प्रस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप रविवारी युकेनं केला होता. हाच आरोप आता अमेरिेकनंही केला आहे. सायबर हल्ला आणि सैन्याची तैनाती यांच्या माध्यमातून रशिया युक्रेन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून सरकार उलथवून लावण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.

हे वाचा- Jeff Bezos मिळवतायत मृत्यूवर विजय, वाढत्या वयावर शोधतायत जालीम उपाय

काय आहे प्रकरण?

युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक पाहून रशिया आक्रमक आहे. युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करण्याच्या मुद्द्याला रशियानं जाहीर विरोध केला आहे. युक्रेनचा नाटोमध्ये समावेश न करण्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी रशियाने केली असून अमेरिकेनं या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही.

First published:

Tags: America, Russia, Uk, Ukraine news