मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, वाचा फायदे

हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, वाचा फायदे

हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, वाचा फायदे (Photo: shutterstock.com)

हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, वाचा फायदे (Photo: shutterstock.com)

Methi Paratha benefits: हिवाळ्यात मेथीचे पराठे खाण्याचे काय-काय फायदे होऊ शकतात, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : हिवाळ्यात (Winter) हिरव्या पालेभाज्यांचे (Green leafy Vegetables) अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. या पालेभाज्या आपल्या शरीराला विविध आजारांपासून दूर ठेवतात. मात्र, लहान मुलं हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी जास्त इच्छुक नसतात. बहुतेक मुलांना पालेभाज्या अजिबातच आवडत नाहीत. अशा वेळी जर तुम्ही पालेभाज्यांपासून स्वादिष्ट पदार्थ (Delicious Dish) बनवले तर मुलं आणि घरातील इतर सदस्यदेखील ते मोठ्या आवडीनं खातील.

मेडीइंडिया डॉट नेटच्या (mediaindia.net) बातमीनुसार, मेथी (Methi) ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक पालेभाजी आहे. मेथीपासून तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. विशेषत: मेथीचे पराठे (Methi Paratha) सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हिवाळ्यात गुळासोबत मेथीचे पराठे खाण्याची मजा काही औरच असते. मेथीपासून बनवलेले पराठे हे बटाट्याच्या किंवा पनीरच्या पराठ्यांपेक्षा चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायीही असतात. ते बनवणंदेखील खूप सोपं आहे. हिवाळ्यात मेथीचे पराठे खाण्याचे काय-काय फायदे होऊ शकतात, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पचायला सोपे आणि पोटाच्या समस्यांवर गुणकारी

मेथीचे पराठे न्याहारी (Breakfast) किंवा दुपारच्या जेवणात (Lunch) कधीही खाऊ शकता. मेथीच्या पराठ्यांचा समावेश हलक्या अन्नामध्ये होतो, ज्यामुळं ते पचायला (Digestion) सोपे असतात. मेथीची पानं पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळं बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या पोटाच्या सामान्य समस्या दूर होतात. शिवाय हिवाळ्यातील अॅलर्जी देखील कमी होते.

वाचा : रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा

लवकर भूक भागते

मेथीचे पराठे हा पूर्ण आहार (Complete meal) समजला जातो. त्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला इतर खूप गोष्टींची गरजही भासत नाही. दही, लोणचं, गूळ किंवा चहासोबत मेथीचे पराठे खाऊन सहज पोट भरतं. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूकही लागत नाही. परिणामी कॅलरी नियंत्रित राहण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol level) खूप जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला तेल आणि तूप खाण्यास मनाई करतात. अशा परिस्थितीत पराठ्याला तेल न लावता कोरडा भाजून खावा. जर तुमची कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य असेल तर तुम्ही थोड्याशा तेलात भाजलेले पराठे खाऊ शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. मेथीपासून बनवलेले पदार्थ खाल्लानं तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राहते. तसेच रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहून शरीर निरोगी राहतं.

वाचा : डोळ्यांचं तेज वाढवतील 'हे' घरगुती आणि रामबाण 6 Juices

ब्रेस्ट फीडिंगसाठी होतो फायदा

मेथी खाल्ल्यानं स्तनदा स्त्रियांच्या शरीरातील दूधाचं (Breast milk) प्रमाण वाढतं. त्यामुळे मेथीचा पराठा किंवा मेथीची भाजी खाणं स्तनदा (Breastfeeding) मातांसाठी हितकारक आहे.

पुरुषांची शारीरिक क्षमता वाढते

मेथी खाल्ल्यानं पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनच्या निर्मितीचं प्रमाण वाढतं. हे हॉर्मोन पुरुषांची शारीरिक क्षमता आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. याशिवाय या हॉर्मोन्समुळे पुरुषांची लैंगिक क्षमताही वाढते. म्हणून हिवाळ्यात पुरुषांनी मेथी खाणं चांगलं समजलं जातं.

एकूणच मेथी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हिवाळ्यातील गोठवणाऱ्या सकाळी नाश्त्यामध्ये गरमागरम मेथी पराठे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

First published:

Tags: Health, Health Tips