मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवा Blood Group सापडला; कशी होईल या रक्तगटाची ओळख?

नवा Blood Group सापडला; कशी होईल या रक्तगटाची ओळख?

वैद्यकीय क्षेत्रात विविध गोष्टींवर संशोधन होत असतं. त्यातूनच या नव्या रक्तगटाची आणि त्यातील प्रोटिनचा उलगडा झालाय.

वैद्यकीय क्षेत्रात विविध गोष्टींवर संशोधन होत असतं. त्यातूनच या नव्या रक्तगटाची आणि त्यातील प्रोटिनचा उलगडा झालाय.

वैद्यकीय क्षेत्रात विविध गोष्टींवर संशोधन होत असतं. त्यातूनच या नव्या रक्तगटाची आणि त्यातील प्रोटिनचा उलगडा झालाय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : अपघातात अतिरक्तस्राव किंवा महिलांना डिलिव्हरीच्या वेळेसही रक्तस्राव झाल्यास रक्त लागतं. अशावेळेस त्या व्यक्तीचा रक्तगट तपासून त्यानुसार रक्त पुरवठा केला जातो. साधारणपणे माणसांचे चार प्रकारचे रक्तगट आढळतात. A, B आणि O, AB असे चार प्रकार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सतत संशोधन सुरू असतं. त्यातूनच संशोधकांना नवा रक्तगट सापडला आहे. या शोधामुळे अनेक रहस्यमय गोष्टींचाही उलगडा होणार आहे. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती.

ब्रिस्टल विद्यापीठ आणि एनएचएसच्या संशोधकांनी दुर्मीळ रक्तगट शोधून काढलाय. हा रक्तगट फारच निराळा आहे. साधारणपणे लाल रक्तपेशींच्या वरच्या स्तरावर प्रोटिन्स आढळतात. त्यामुळे रक्तातल्या प्रोटिन्सच्या प्रमाणावर व्यक्तीच्या रक्तगटाची निश्चिती होते. A, B, O, AB आणि Rh (प्लस किंवा मायनस) या रक्तगटांशिवाय इतरही महत्त्वाचे रक्तगट आहेत. व्यक्तिपरत्वे रक्तगटात फरक आढळतो.

एलोइम्युनायझेशनद्वारे हा रक्तगट ओळखता येतो. एलोइम्युनायझेशन म्हणजे व्यक्तीच्या शरीरात ज्यावेळेस जीवाणू, विषाणूंचा शिरकाव होतो,अशावेळेस शरीर आपोआप अँटिबॉडी बनवतं. अर्थात, स्वसंरक्षणासाठी रोगप्रतिकारक कवच तयार होतं. तुमच्या शरीरात अशा प्रकारच्या एलोअँटिबॉडीज असतील तर रक्तदान करताना त्या व्यक्तीला, महिलांना गरोदरपणात यामुळे धोका संभवतो. कारण यामुळे तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचू शकते. ही एक गंभीर बाब आहे. ब्रिस्टल स्कूल ऑफ बायोकेमिस्ट्री आणि इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लॅबोरेटरीने 30 वर्षांपूर्वीच्या या रहस्याचा उलगडा करण्यासाठी विविध प्रयोग चाचण्या सुरू केल्यात.

रक्त शुद्धीसाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, अ‍ॅलर्जी-त्वचेशी संबंधित समस्यांपासून कायमची मुक्ती

30 वर्षांपूर्वीच्या रहस्याचा उलगडा

संशोधनात शास्त्रज्ञांना 30 अँटिजेन्सचा शोध घ्यायचा होता. हे 30अँटिजेन्स अगदी दुर्मिळ आहेत. याच संशोधनात त्यांना Er अँटिजेनचा शोध लागला. याचा शोध 30 वर्षांपूर्वीच लागला होता. त्यावर पुरेसे संशोधन झाले नव्हते. परिणामी, हे एक गूढ रहस्य बनलं होतं. शास्त्रज्ञांनी या Er अँटिजेनचा शोध जीन्स कोडिंगच्या माध्यमातून लावला. रक्तातील डीएनएचाही आधार घेतला. जीन कोडिंगच्या संशोधनात शास्त्रज्ञांना पिझो1 प्रोटिनमध्ये विशेष फरक जाणवला.

Er ठरतोय जगातील दुर्मिळ रक्तगट

शास्त्रज्ञांनी प्रयोग सुरू केले. त्यावेळेस अशा पेशींची मदत घेतली, ज्या दीर्घकाळ टिकतात. त्या पेशींतून पिझो1 प्रोटिन काढून टाकलं. तेव्हा असं निदर्शनास आलं की Er अँटिजेनशी प्रतिकार करण्यासाठी शरीरात एलोअँटिबॉडीज तयार होतात. पिझो 1 प्रोटिन हे Er अँटिजेनमध्ये आढळतं. यामुळेच रक्तदान करताना आणि महिलांना गरोदरपणात त्यांच्या इम्युन यंत्रणेला धोका पोहोचतो. संशोधनात पिझो 1 प्रोटिन या मागचं प्रमुख कारण असल्याचं दिसून आलं, ज्यामुळे Er हा अतिशय दुर्मिळ आणि नवा रक्तगट तयार झाला. हा रक्तगट असलेल्या महिलांचा गर्भपात होतो. पर्यायाने, महिला आणि तिचे मूल दगावते.

कसा ओळखावा Er रक्तगट?

शास्त्रज्ञांनी आता Er रक्तगट शोधून काढण्यासाठी कंबर कसली आहे. जेणेकरून रक्तदान करणार्‍या व्यक्तीच्या आणि गरोदर महिलांचा जीव धोक्यात येणार नाही. जर Er अँटिजेनची पातळी वाढली तर शरीरातील एलोअँटिबॉडीज त्याचा नि:पात करतात. ज्यामुळे गरोदर महिला आणि गर्भ दोन्हींचा जीव धोक्यात येतो. त्यांचा मृत्यू होतो. कारण पिझो 1 प्रोटिन हे तब्येतीसाठी तारक की मारक ठरतं, यावर अजूनही संशोधन सुरू आहे.

पिझो 1 प्रोटिनच उलगडणार रक्ताशी निगडित रहस्य

ब्रिस्टल विद्यापीठाचे मुख्य संशोधक डॉ. टिम सैचवेलनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘Er रक्तगटाबद्दलचं रहस्य उलगडणं आव्हानात्मक आहे. अजूनही संशोधन सुरू आहे. पिझो1 प्रोटिन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकू शकेल.’ सेल बायोलॉजीचे प्राध्यापक अ‍ॅश टॉय म्हणाले, ‘लाल रक्तपेशी म्हणजे जगासाठी गूढ रहस्याप्रमाणे आहेत. पिझो 1 प्रोटिनला आपण मिकॅनोसेन्सरी प्रोटिन म्हणतो. यामुळे लाल रक्तपेशीतील प्रत्येक बदल टिपला जातो. प्रत्येक पेशीत याचं प्रमाण कोटींच्या घरात आहे.’ याबद्दलची माहिती ‘ब्लड जर्नल’ प्रकाशित झाली होती.

First published:

Tags: Blood donation, Health