मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका

झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका

Sudden Weight Loss : वजन कमी होणे गंभीर नाही. परंतु तुम्ही काहीही प्रयत्न न करता अचानक वेगाने वजन कमी होणे धोकादायक असू शकते. यामुळे काही गंभीर आजारांचा धोकाही उद्भवतो.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 14 ऑगस्ट : आजच्या युगात लोक आपले वजन कमी करण्यासाठी खूप काही करत असतात. ते अन्न कमी करतात, निरोगी आहारावर राहतात, जिममध्ये जातात, नियमित व्यायाम करतात. मात्र जर असं झालं की तुमचं वजन तुम्ही काहीही न करता सतत कमी होत असेल तर ती तुमच्यासाठी डोक्याची घंटा असू शकते. झपाट्यांरे वजन कमी होणे तुमच्या तंदुरुस्त किंवा सडपातळ असण्याचं लक्षण नसून ते अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. पाहा झपाट्याने वजन कमी झाल्यास कोणकोणत्या आजारांचा धोका असू शकतो. कॅन्सर आपल्या शरीराकडे नियमित आणि काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर वजन झपाट्याने कमी होत असेल तर ती धोक्याची घंटा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आहारात आणि दिनचर्यामध्ये कोणताही बदल केलेला नसताना, तिचे वजन कमी होत असेल. तर ते कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवा आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Best Diet in Dengue: डेंग्यू झाल्यावर भात खावा की टाळावा? बकरीचं दूध चांगलं की...? तज्ज्ञांचं मत काय?

डिप्रेशन वजन कमी होणे हा नैराश्याचा दुष्परिणाम असू शकतो. नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशनचा परिणाम मेंदूच्या त्याच भागांवर होतो जे भूक नियंत्रित करतात. यामुळे भूक न लागणे आणि शेवटी वजन कमी होऊ शकते. नैराश्य काही लोकांमध्ये भूक वाढवूदेखील शकते. त्याची लक्षणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात. डायबिटीज वजन कमी होणे हे डायबिटीजचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. पेशींपर्यंत ऊर्जा पोहोचत नाही. शरीरात उर्जेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो आणि वजन कमी होऊ लागते.

फक्त फायदेच नाही तर जास्त पाणी पिण्याचे गंभीर तोटेही; शरीरावर होतात हे भयंकर परिणाम

ओव्हरअ‍ॅक्टिव्ह थायरॉईड जेव्हा तुमची थायरॉईड ग्रंथी जास्त थायरॉईड संप्रेरक बनवते तेव्हा हायपरथायरॉईडीझम किंवा ओव्हरअ‍ॅक्टिव्ह थायरॉइड विकसित होते. हे हार्मोन्स शरीरातील पचनक्रियेसह अनेक कार्ये नियंत्रित करतात. जर तुमची थायरॉईड ओव्हरअ‍ॅक्टिव्ह असेल, तर तुमची भूक चांगली असली तरीही तुम्ही पटकन कॅलरी बर्न कराल. परिणामी तुमचे वजन कमी होऊ शकते.
First published:

Tags: Lifestyle, Side effects, Weight loss

पुढील बातम्या