मराठी बातम्या /बातम्या /heatlh /नावावर जाऊ नका, खूप फायद्याचे असतात ढेमसे; Weight Loss पासून BP पर्यंत अनेक समस्या करतं दूर

नावावर जाऊ नका, खूप फायद्याचे असतात ढेमसे; Weight Loss पासून BP पर्यंत अनेक समस्या करतं दूर

प्रत्येक ऋतूमध्ये काही विशेष पदार्थ खाल्याने आपले आरोग्य चांगले राहाते. असाच एक भाजीचा प्रकार आहे तो म्हणजे ढेमसे. ढेमश्याला सुपरफूडदेखील म्हणतात.

प्रत्येक ऋतूमध्ये काही विशेष पदार्थ खाल्याने आपले आरोग्य चांगले राहाते. असाच एक भाजीचा प्रकार आहे तो म्हणजे ढेमसे. ढेमश्याला सुपरफूडदेखील म्हणतात.

प्रत्येक ऋतूमध्ये काही विशेष पदार्थ खाल्याने आपले आरोग्य चांगले राहाते. असाच एक भाजीचा प्रकार आहे तो म्हणजे ढेमसे. ढेमश्याला सुपरफूडदेखील म्हणतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 नोव्हेंबर : आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी चांगला आणि पौष्टिक आहार, चांगली झोप आणि व्यायाम यांची गरज असते. या सर्वांमध्ये सर्वात जास्त महत्वाचे असते ते म्हणजे आपला आहार. प्रत्येक ऋतूमध्ये काही विशेष पदार्थ खाल्याने आपले आरोग्य चांगले राहाते. असाच एक भाजीचा प्रकार आहे तो म्हणजे ढेमसे. आता ढेमसे म्हणलं की, अनेक जणांचं तोंड आधीच कडू झालं असेल. मात्र हे ढेमसे तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात.

ढेमश्याच्या पौष्टिक मूल्यांबद्दल बोलायचे झाले तर, 100 ग्रॅम ढेमश्यामध्ये सुमारे 93 ग्रॅम ओलावा, कॅलरीज 21, प्रथिने 1.4 ग्रॅम, चरबी 0.2 ग्रॅम, खनिजे 0.5 ग्रॅम, फायबर 1 ग्रॅम याशिवाय व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, कॉपर असते. आणि शरीरासाठी फायदेशीर इतर घटक देखील आहेत. म्हणूनच ढेमश्याला सुपरफूडदेखील म्हणतात. अशा या ढेमश्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत.

प्रदूषणामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी; ‘हा’ काढा देईल आराम

ढेमसे खाण्याचे फायदे

- ढेमश्यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. यामुळे ते कोणत्याही अतिरिक्त कफ किंवा श्लेष्माचा स्राव सहजपणे सोडवते आणि श्वसनमार्गातून काढून टाकते. ढेमसे फुफ्फुसाच्या कार्यास खूप फायदेशीर ठरते आणि कोणत्याही ऍलर्जी आणि श्वासोच्छवासाच्या अडचणींना प्रतिबंधित करते.

- हल्ली बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय खूप वाढली आहे. त्यामुळे लठ्ठपणाची समस्याही सामान्य झाली आहे. यासाठी ढेमसे तुमची मदत करू शकतात. कारण हे तुमच्या शरीरातील वाढती चरबी कमी करतात.

- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ढेमश्याचा रस फायदेशीर आहे. हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते. यामुळे शरीराचे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते.

- ढेमश्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन सी, लोह किंवा पोटॅशियम असतात, त्यामुळे हे बुद्धी तीक्ष्ण करण्यास मदत करते, स्मरणशक्ती सुधारते आणि कमजोरी दूर करण्यास देखील मदत करते.

- हृदयरोग्यांसाठी ढेमसे अतिशय फायदेशीर आहेत. याचा रस प्यायल्याने हृदयाची कार्य क्षमता वाढू शकते.

Fatty Liver Disease : ...तर दारू न पिताही तुमचं लिव्हर होतं खराब; दिसतात अशी लक्षणं

- ढेमसे पोटासाठी फायदेशीर असल्याचे लोक मानतात. ढेमश्यामध्ये नॅच्युरल मॉइश्चर आणि फायबरदेखील आहे. म्हणून ते बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पोटदुखी टाळण्यास मदत करते.

First published:
top videos

    Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle