दिल्ली, 10 सप्टेंबर : आयूर्वेदात (Ayurveda) शरिरातील तीन प्रकृतींविषयी माहिती दिली गेली आहे. वात पित्त आणि कफ. प्रत्येकाच्या शरिरात यापैकी कुछलातरी एक दोष नक्कीच असतो. पित्त जास्त (Bile defects) असलेल्या लोकांमध्ये उष्णता (Heat) होण्याचे प्रमाण हे अधिक असते. शरिरात पित्ताचे असंतूलन हे त्याचे महत्वाचे कारण आहे. शरिरात उष्णता वाढल्याने आपल्याला अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. परंतू आता उष्णता कमी करणाऱ्या अशा काही घरघूती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या स्वास्थासाठी (Health Tips) फायदेशीर ठरू शकते.
पित्त असंतूलित होण्याची लक्षणं (imbalanced pitta dosh symptoms)
आयुर्वेदिक विषयांच्या जाणकार डॉ. रेखा म्हणतात की पित्त किंवा अग्निदोष झाल्यामुळे शरिरातील उष्णता वाढते, त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्घवण्याची शक्यता असते.
असंतुलित पित्त दोषाची शारीरिक लक्षणं
1. भूक आणि तहान लागणे
2. केसांना पांढरेपणा येणे
3. हॉर्मोन्सचं असंतुलन
4. त्वचेची आग होणे
5. तोंडातून वास येणे
6. घसात आग होणे
7. डोळे लाल होणे
8. छातीत आग होणे
9. मासिक पाळीच्या काळात जास्त त्रास होणे
Fit आणि Healthy म्हणजे सारखं नव्हे; समजून घ्या या दोन्हीमधील छोटासा फरक
असंतुलित पित्त दोषांची भावनात्मक लक्षणं
1. शरिरात आग होणे
2.मानसिक अस्थिरता
3. चिडचिड होणे
4. अस्वस्थ वाटणे
पित्तदोष कमी करण्यासाठी घरघूती आयुर्वेदिक ड्रिंक कशी तयार कराल?
आयुर्वेदिक डॉ. रेखा यांच्या मते Sharngadhara Samhita मध्ये Dhanyaka Himam ची रेसिपी सांगितली गेली आहे. जी शरिरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
ड्रिंक बनवण्यासाठी लागणारी सामग्री
1. 8 कोथिंबीरचे बारिक केलेले बीज
2. 50 ML पाणी
3. मिश्री
आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्याची पद्धत (arurvedic drink recipe)
रात्री कोथंबिरचे बीज भिजवण्यासाठी ठेवा, त्यानंतर त्याला रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर सकाळी त्याला एका ग्लासात टाका. त्यानंतर त्यात मिश्री मिसळून सकाळी सकाळी उपाशीपोटी पिऊन घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Personal life