मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Dengue मुळे वाढली चिंता? आहारात 'या' गोष्टींचा समावेश केल्याने झटपट वाढतील प्लेटिलेट्स

Dengue मुळे वाढली चिंता? आहारात 'या' गोष्टींचा समावेश केल्याने झटपट वाढतील प्लेटिलेट्स

कोरोनाची लाट विरते न विरते तोच डेंग्यू आजाराने (Dengue) डोकं वर काढलं आहे. डासांमार्फत पसरणाऱ्या या रोगात रक्तातल्या प्लेटिलेट्स झपाट्याने कमी होतात. म्हणून औषधांबरोबर पूरक आहारही आवश्यक असतो.

कोरोनाची लाट विरते न विरते तोच डेंग्यू आजाराने (Dengue) डोकं वर काढलं आहे. डासांमार्फत पसरणाऱ्या या रोगात रक्तातल्या प्लेटिलेट्स झपाट्याने कमी होतात. म्हणून औषधांबरोबर पूरक आहारही आवश्यक असतो.

कोरोनाची लाट विरते न विरते तोच डेंग्यू आजाराने (Dengue) डोकं वर काढलं आहे. डासांमार्फत पसरणाऱ्या या रोगात रक्तातल्या प्लेटिलेट्स झपाट्याने कमी होतात. म्हणून औषधांबरोबर पूरक आहारही आवश्यक असतो.

दिल्ली, 17 सप्टेंबर : सध्या पावसाळा (Rain related diesases) सुरू असल्याने या मोसमात डेग्यू (Dengue) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणूचे रूग्ण जरी (Coronavirus) कमी झालेले असले तरीही डेग्यूचे पेशंट हे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण असून याचा लोड हा वैद्यकीय सुविधेवरही (Medical facilities) पडत आहे. पावसाळा असल्याने हा साथरोग (Communicable diseases) आणखी फोपावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने याविषयी खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात हे मच्छर साफ पाण्यात वाढतात, आणि ते चावल्याने रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. डेग्यू हा असा रोग आहे ज्यामुळे डेग्यूग्रस्ताचा जीवही जाण्याची शक्यता असते. कारण डेग्यूमुळे व्यक्तीचे शरीर हे पूर्णत: कमजोर पडलेले असते. त्यामुळे जर तुम्हाला डेंग्यू किंवा डेंग्यूची लक्षणं जाणवत असतील तर कोणती काळजी घ्यायला हवी, आहार कोणता असायला हवा? याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊयात.

पपईचा ज्यूस

पपईचा ज्यूस हे डेंग्यूच्या आजाराविरोधात लढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यामुळे जर तुम्हाला डेंग्यूची लक्षणं असतील तर पपईचे ज्यूस घ्यावे. त्याचबरोबर त्यात लिंबूचे रस मिसळून पिले तर त्याचा आणखी फायदा होतो.

नारळ पाणी

नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे शरीर हाइड्रेटेड राहते. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. डेग्यूचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला काहीही खाण्यापिण्याचे मन होत नाही. त्यामुळे नारळ पाणी हे आरोग्यदायी आहे.

दिवसभरात 7000 पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी? संशोधनातून मोठा खुलासा

डेग्यूच्या मच्छरांपासून असा करा स्वत:चा बचाव

कचऱ्यात पाणी जमू देऊ नका, कारण त्यात मच्छर तयार होतात.

स्वयंपाक घरातील सर्व भांडी झाकून ठेवा.

घरातून बाहेर पडताना अंगभर कपडे घाला.

घरातील लहान मुलांसाठी मच्छरदानी वापरा.

संध्याकाळच्या वेळी दरवाजे-खिडक्या बंद ठेवा.

विनाकारण फिरणे टाळा, ज्यामुळे संसर्ग कमी होईल.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Medical, Serious diseases