मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

OMG! हरणाच्या डोळ्यात उगवले केस; पाहून पशुतज्ज्ञही हादरले

OMG! हरणाच्या डोळ्यात उगवले केस; पाहून पशुतज्ज्ञही हादरले

हरणाच्या शरीरावर असलेल्या केसांसारखेच केस त्याच्या डोळ्यातील बुब्बुळ म्हणजे आयबॉल्सवरही आहेत.

हरणाच्या शरीरावर असलेल्या केसांसारखेच केस त्याच्या डोळ्यातील बुब्बुळ म्हणजे आयबॉल्सवरही आहेत.

हरणाच्या शरीरावर असलेल्या केसांसारखेच केस त्याच्या डोळ्यातील बुब्बुळ म्हणजे आयबॉल्सवरही आहेत.

टेनेसी,  23 फेब्रुवारी : केस म्हटलं की ते डोक्यावर किंवा शरीरावरही असतात. डोळ्यांच्या पापण्यांनाही केस असतात. पण डोळ्यांच्या आत केस हे नवलंच नाही का? एका हरणाच्या (Deer) चक्क डोळ्यातच केस उगवले (Hair growing in Eyeballs) आहेत. हे वाचून कुणालाही विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.  या हरणाचे डोळे पाहिल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या टेनेसीमध्ये हे हरिण सापडलं असून त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये केस उगवले आहेत. हरणाच्या अंगावर असलेल्या केसांसारखेच केस त्याच्या डोळ्यातील बुब्बुळ म्हणजे आयब़ॉल्सवरही आहेत. त्यामुळे या हरणाला समोरचं दिसत नाही. या हरणाच्या डोळ्यामध्ये केस उगवल्याबाबतची माहिती क्वॉलिटी व्हाइटटेल्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झाली आहे. हे मॅगझिन अमेरिकेच्या नॅशनल डियर असोसिएशनद्वारे प्रकाशित केलं जातं. आता या हरणाच्या डोळ्यात केस का उगवले तर याचं कारण म्हणजे त्याला असलेला गंभीर आजार. या हरणाच्या शरीराची अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली. त्यातून हे समजलं की हरणाला एपिजुओटिक हेमोरॅजिक डिजीज (EHD) झाला आहे. त्यामुळे हरणाला ताप येत आहे. त्याच्या शरीरातील पेशी टम्म फुगत होत्या. या आजाराला वन्यजीव तज्ज्ञ डरमॉयड (Dermoid) असं म्हणतात. हे एका बेनिन ट्युमरमुळे (Benign Tumor) झालं आहे. साधारणत: हा ट्युमर शरीराच्या इतर अवयवांमध्ये सापडतो. मात्र हरणाच्या डोळ्यांमध्ये हा ट्युमर असल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या हरणाच्या डोळ्यांमध्ये स्किन टिश्यू तयार झाला आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यांच्या आयबॉल्सवर केस उगवले आहेत. हे वाचा -  अरे बापरे! हरणाच्या एका उडीत 'जंगल का राजा'ही गार; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल टेनेसी वाइल्डलाइप रिसोर्स एजन्सीचे बायोलॉजिस्ट स्टर्लिंग डॅनियल्स यांनी सांगितले की, 'या हरणाला दिवस आहे की रात्र आहे हे समजतं. पण  तो कोणत्या दिशेने चालला आहे, हे त्याला कळत नाही' शिवाय हा आजार झालेल्या हरणांना माणसांची वाटणारी भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळेच ते माणसांवर हल्लादेखील करू शकतं. EHD आणि डोळ्यांमध्ये केस उगवण्याचा काय संबंध आहे याचा शोध वाइल्डलाइप एक्सपर्ट अजूनही लावू शकले नाहीत. या हरणाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्याची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. हे वाचा - Shocking! ऑनलाईन ऑर्डर केलं Cold drink आणि बाटलीत मिळाली लघवी युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या वेट स्कूलमधील असोसिएट प्रोफेसर डॉ. निकोल नेमेथ यांनी सांगितले की, 'या हरणाला हा आजार त्याच्या जन्मापासूनच झाला असवा आणि तो हळूहळू वाढत गेला. या हरणाचे वय एका वर्षापेक्षा थोडं जास्त असावं. त्यानंतर त्याला EHD झाला असावा. दोन्ही आजारांवर काही उपचार नाही. डोळ्यांमध्ये केस येण्याची प्रक्रिया खूप हळू आहे त्यामुळे या हरणाने एका वर्षापेक्षा जास्त वेळ जंगलात आरामात घालवला. पण आता त्याला या आजाराचा त्रास होतो आहे"
First published:

Tags: Deer, Eyes damage, Rare disease, United States of America

पुढील बातम्या