सोशल व्हायरल, 22 फेब्रुवारी: सिंहाला (Lion) आपल्या ताकदीमुळे आणि शिकार करण्याच्या कौशल्यांमुळे जंगलाचा राजा (King of Forest) म्हटलं जातं. सिंह अनेकदा मोठं मोठ्या प्राण्यांनाही काही क्षणातचं जेरीस आणू शकतो. आपल्या चपळाईने शिकार करण्यासाठी सिंहाला ओळखलं जातं. पण काही वेळा असं काहीतरी विपरीत दृश्य नजरेस पडतं, ज्यामुळे आपल्याला आपल्याचं डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक हरीण थेट सिंहाच्या समोरचं आलं आहे. हरीणाच्या अशा अचानक येण्याने, इतर वेळी डरकाळी फोडून इतर प्राण्यांना घाबरवणारा सिंह स्वतःच घाबरला आहे. हा व्हिडिओ लाइफ अँड नेचर नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका रस्त्याने चार सिंह अगदी राजेशाही थाटात डुलत डुलत जात आहेत. या रस्तावर काही वाहनं देखील उभी आहेत. समोर कारमध्ये बसलेला व्यक्ती आपल्याला इजा पोहचवेल, याची थोडीही भीती न बाळगता हे सिंह निर्भयपणे रस्त्यावर चालत आहेत. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं रस्ता ओलांडण्यासाठी एक हरीण वेगाने धावत आलं आहे. यावेळी या हरणाला पाहून सिंह देखील घाबरला आहे.
When arriving at the wrong time pic.twitter.com/POnsJ2kJ1T
— existing in nature (@afaf66551) February 20, 2021
हे ही वाचा - मुखवटा घालून घोड्यासमोर गेला व्यक्ती; पुढे असं काही झालं की…पाहा VIRAL VIDEO या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक हरीण वेगात रस्ता पार करताना दिसत आहे. पण हरणाला रस्त्यावर सिंहाचा कळप दिसल्यानंतर एका क्षणासाठी हरीण घाबरलं आहेच. पण दुसरीकडे सिंह देखील घाबरला आहे. यावेळी सिंहाला काही सुचण्याच्या अगोदर हरणाने सिंहाच्या अंगावरून उडी घेत धूम ठोकली आहे.