मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! ऑनलाईन ऑर्डर केलं Cold drink आणि बाटलीत मिळाली लघवी

Shocking! ऑनलाईन ऑर्डर केलं Cold drink आणि बाटलीत मिळाली लघवी

बाटली पाहून ग्राहकाला धक्काच बसला.

ब्रिटन, 22 फेब्रुवारी : घरात जेवण करायचा कंटाळा आला आणि बाहेर हॉटेलमध्येही जायचं नसेल तर ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागवणं (online food order) हा एक पर्याय आहे. आपल्यापैकी कित्येक जण ऑनलाइन जेवण ऑर्डर करतात. तसं ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर अनेकांचे काही ना काही विचित्र अनुभव आहेतच. सध्या अशाच एका ऑनलाइन मागवलेल्या ऑर्डरची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

यूकेतील एका व्यक्तीनं काही पदार्ख आणि कोल्ड ड्रिंक ऑनलाइन ऑर्डर केलं. पण जेव्हा त्याने डिलीव्हरी घेतली तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्याला कोल्ड ड्रिंक नव्हे तर त्या बाटलीत चक्क लघवी मिळाली आहे. या व्यक्तीनं आपल्या ट्विटवर या बाटलीचा फोटो शेअर केला आहे.

ऑलिव्हर मॅकमॅनस Oliver McManus असं या व्यक्तीचं नाव. तो इंग्लंडमधील राहणारा आहे. त्याने काही नॉनव्हेज पदार्थ आणि कोकची बाटली मागवले होते. पण कोकच्या बाटलीत लघवी होती. त्याने @HelloFreshUK ला हा फोटो टॅग केला आहे.

हे वाचा - दुधासोबत अजिबात खाऊ नका ब्रेड-बटर! हे पदार्थ आणि दूध असं समीकरण ठरेल हानीकारक

नवभारत टाइम्सनं मेट्रोच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार ओलिव्हरनं सांगितलं, जेव्हा त्याला डिलीव्हरी मिळाली होती तेव्हा कोकची बाटली खुली होती. पण बाकी खाद्यपदार्थ सील होते. दरम्यान @HelloFreshUK ने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना ओलिव्हरची माफी मागितली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करून संबंधितावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासनही दिलं आहे.

First published:

Tags: Shocking news, Uk, Viral