मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना महासाथीचा चिमुरड्यांवर होतोय गंभीर परिणाम? UNICEF चा धक्कादायक अहवाल

कोरोना महासाथीचा चिमुरड्यांवर होतोय गंभीर परिणाम? UNICEF चा धक्कादायक अहवाल

कोरोना महासाथीचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे.

कोरोना महासाथीचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे.

कोरोना महासाथीचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे.

नवी दिल्ली, 06 मार्च :  कोरोनामुळे (coronavirus) शाळा बंद... ऑनलाइन शाळा आहेत पण त्या काही वेळापुरतं, प्रत्यक्षातील शाळांप्रमाणे जास्त तास सुरू राहत नाही... लहान मुलांची काय बाबा मज्जाच आहे. असंच वर्क फ्रॉम होम करत असतानाही ऑफिसच्या कामाचा प्रचंड ताण असणाऱ्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला वाटत असावं. पण कोरोनाच्या महासाथीत चिमुकल्या मुलांची नेमकी काय अवस्था आहे, हे युनिसेफच्या (UNICEF) अहवालातून स्पष्ट होतं. कोरोनामुळे (Corona) जगभरात अनेक घटकांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा थेट परिणाम जसा शारीरिक आरोग्यावर (Physical Health) होत आहे, तसाच काहीसा परिणाम मानसिक आरोग्यावरदेखील (Psychological Health) होत आहे. कोरोना महासाथीचा भारतातील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचं युनिसेफनं (UNICEF) गुरुवारी स्पष्ट केलं आहे. शाळा बंद झाल्यानं मुलांना शिक्षण मिळणं तसंच समवयस्क किंवा मित्र-मैत्रिणींसोबत थेट संवाद साधण्यात मर्यादा येत आहेत. कोरोनामुळे मुलांची काळजी घेणं आणि त्यांना सातत्यानं कोणत्या तरी गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं हे पालक (Parents) तसंच मुलांची काळजी घेणाऱ्यांसाठी (Caregivers) जिकिरीचं ठरत असल्याचं युनिसेफच्या सूत्रांनी सांगितलं. जागतिक संस्थेच्या मते, कोरोना साथीपूर्वी भारतातील अंदाजे 50 दशलक्ष मुलांना मानसिक आरोग्याच्या (Children Psychological Health) अनुषंगाने त्रास होत होता. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर देशभरात किमान नऊ महिने घरीच राहा असं धोरण अवलंबण्यात आलं. त्यामुळे 7 पैकी 1 किंवा जगभराचा विचार केला तर सुमारे 332 दशलक्ष मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे. हे वाचा - वेळीच लक्ष द्या, कोरोनामुळे होतोय 'हा' मानसिक आजार; उपचारांबाबत तज्ज्ञांचा सल्ला युनिसेफने चाईल्डलाईनच्या (Childline) सहकार्याने पालक, केअरगिव्हर्स, मुलं तसंच किशोरवयीन मुलांसाठी एक पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेत कोरोना काळात काय काळजी घ्यावी, तसंच साथीच्या परिस्थितीत ताणतणाव (Stress), भीती (Fear) आणि चिंता (Anxiety) या समस्यांचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. साथीच्या आजारामुळे निर्माण होणारा तणाव, मुलांचं मानसिक आरोग्य आणि कल्याण ही गंभीर चिंतेची बाब आहे. यासाठी त्यांना शिक्षक, केअरगिव्हर्स आणि पालकांकडून मानसिक- सामाजिक आधार प्राधान्यानं मिळणं गरजेचं आहे. मुलं आणि केअरगिव्हर्स यांना ताणतणाव, भीती आणि चिंतेचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत करणारी सहाय्यक संरचना आणि कृती अधिक मजबूत करणं आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात मुलांमध्ये हिंसक वृत्तीत वाढ होत असल्याचं आपण पाहात आहोत. मुले आणि मुलींच्या शारीरिक संरक्षणाइतकीच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारी रचना तयार करण्यासाठी आपल्याला प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचं, युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी सांगितलं. हे वाचा - एकाच दिवसात 10000; या 4 शहरांमुळे गाठला 4 महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक महासाथीदरम्यान युनिसेफने चाईल्डलाईन, सिव्हील सोसायटी नेटवर्क, जिल्हा बाल संरक्षण संस्था, बाल देखभाल संस्था आणि वन स्टॉप सेंटरच्या 8000 हून अधिक कार्यकर्त्यांना मुलांना मानसशास्त्रीय प्रथमोपचार देण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. सुमारे 17 राज्यांमधील अंदाजे 4,46,180 मुले, पौगंडावस्थेतील मुलं, पालक किंवा केअरगिव्हर्स यांना मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्रीय पाठबळाच्या अनुषंगाने मदत दिली जात आहे. राज्य सरकार आणि सीएसओ यांच्या भागीदारीतून युनिसेफने 7,00,000 पेक्षा अधिक स्थलांतरीत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभ आणि सामाजिक संरक्षण मिळवून दिलं आहे. तसंच संरक्षित क्षेत्रांमध्ये कोरोनाची जोखीम, संवाद, समुदायाचा सहभाग, लिंग आधारित हिंसा (Gender base Violence) बाल मजुरी आणि बालविवाह यावर काम केलं जात असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
First published:

Tags: Coronavirus, Covid19, Health, Mental health, Parents and child, Stress, UNICEF

पुढील बातम्या