वेळीच लक्ष द्या, कोरोनामुळे होतोय 'हा' मानसिक आजार; शोध आणि उपचारांबाबत तज्ज्ञांनी दिला सल्ला

वेळीच लक्ष द्या, कोरोनामुळे होतोय 'हा' मानसिक आजार; शोध आणि उपचारांबाबत तज्ज्ञांनी दिला सल्ला

जगभरात गेल्या जवळपास वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या साथीनं लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. कोरोनामुळे उद्भवणारे धोके, भविष्याची चिंता यामुळे लोकांचं मानसिक स्वास्थ हरवलं आहे.

  • Share this:

न्युयॉर्क, 3 मार्च : जगभरात जवळपास गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या साथीनं (Corona virus Pandemic) लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. कोरोनामुळं उद्भवणारे धोके, भविष्याची चिंता यामुळं लोकांचे मानसिक स्वास्थ हरवलं आहे. अख्खं जग या पॅनडॅमिक पॅरानोईया (Pandemic Paranoia) म्हणजेच साथ रोगामुळे निर्माण झालेल्या मानसिक भयग्रस्ततेच्या संकटातून जात आहे.

कोविड-19 च्या साथीनं (Covid 19 Pandemic) सर्वत्र भीती निर्माण केली असून, आर्थिक नुकसानही केलं आहे. जगभरातील 2.53 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला असून, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे. कोविड-19 ची ही साथ सगळ्यांच्या कायम लक्षात राहील अशी सर्वात वाईट वैद्यकीय आपत्ती ठरली आहे. लॉकडाउन, सॅनिटायझर्स, मास्क, पीपीई कीट, प्रवासावर बंदी, क्वारंटाईन या नव्या गोष्टी या साथीमुळं मानवी आयुष्यात आल्या आहेत. या सर्वामुळं जगातील कामकाजाच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. यातून अनिश्चितता, चिंता आणि पुढे काय होईल याची भीती यातून एका नव्या मानसिक आजारालाही जन्म मिळाला आहे. या मानसिक अस्वास्थाच्या स्थितीला पॅनडॅमिक पॅरानोईया असं म्हटलं जात आहे.

(वाचा - पार्लरमध्ये चेहऱ्याची लागली वाट; कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली)

याबाबत ‘सीएनएन’शी बोलताना न्यूयॉर्कमधील फॉरेन्सिक मानसोपचार तज्ज्ञ आणि हिंसाचार विषयातील तज्ज्ञ डॉ. बॅंडी एक्स. ली म्हणाले की, ‘या साथीच्या रोगानं सर्वत्र अनिश्चितता आणि तणाव निर्माण केला आहे. दीर्घकाळ झालेल्या लॉकडाउननं (Lockdown) सामाजिक व्यवस्था ढवळून काढली. आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या, अमली पदार्थांचं सेवन, नैराश्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वर्ल्ड मेंटल हेल्थ कोअलिशनचे अध्यक्ष ली यांच्या मते, अमेरिकेतील सद्य परिस्थिती महामंदीच्या काळाच्या तुलनेत अधिकच वाईट आहे. या साथ रोगाच्या परिस्थितीची हाताळणी योग्यरीत्या न झाल्यानं ही स्थिती उदभवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू खरा नसल्याचा दावा अनेकदा केला आहे, त्यांच्या या खोटेपणाला त्यांचे मतदार आणि समर्थकांनीही समर्थन दिलं, असंही ली यांनी म्हटलं आहे. समाजात अशा रीतीनं पसरवण्यात आलेल्या गैरसमजांमुळं भीती आणि मानसिक अस्वास्थ निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली असल्याचं एका टॉक शोचे होस्ट सेठ मायर्स यांनी म्हटलं आहे. ‘या हिवाळी हंगामात हा साथरोग अतिशय धोकादायक असल्याचं सेठ मायर्स यांनी म्हटलं आहे.

(वाचा - आता 'या' वेळेत घेता येणार कोरोना लस; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा)

या साथीमुळे उद्भवलेल्या मानसिक आजाराचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिले असून, याची पहिली पायरी म्हणजे समस्या ओळखणं आणि दुसरा टप्पा म्हणजे लोकांशी बोलणं. हा या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सपोर्ट सिस्टम बनवणं, मित्रांवर, प्रियजनांवर विश्वास ठेवणं आणि त्यांची मदत स्वीकारणं हे या आजारावर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

(वाचा :...तर मला कोरोना लस घेता येईल का? लसीकरणाबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर )

“एखाद्याला आपल्याला पॅरोनोईआ झालेला आहे, हे लक्षात आलं तर दैनंदिन कामकाजाचा शिस्तबद्ध आराखडा करून तो यावर मात करू शकतो,’ असं मत अमेरिकेतील क्लीव्हलँड येथील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ अ‍ॅडम बोरलँड यांनी म्हटलं आहे. एखादं उद्दीष्ट निश्चित करणं आणि ते पूर्ण करणं याचं नियोजन करून अशा मानसिक आजारावर मात करणं शक्य आहे. यातून वाईट, भीतीदायक विचार दूर सारण्यास मदत होऊ शकते.

स्वत:शी संवाद साधण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवणं, प्रियजनांशी संवाद साधणं, झोप घेणं आणि व्यायामासारख्या इतर गोष्टींचा अंतर्भाव करून पॅरोनोईयाला कारणीभूत ठरणाऱ्या तणाव आणि अनिश्चिततेच्या विचारांवर मात करण्यास मदत होऊ शकते. पुरेशी झोप आणि योग्य आहार ही निरामय आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असंही बोरलँड यांनी म्हटलं आहे.

First published: March 3, 2021, 5:43 PM IST

ताज्या बातम्या