नवी दिल्ली, 31 डिसेंबर : ओमिक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे, चीनमध्ये तर या व्हेरियंटने त्याचं भयानक रूप दाखवलं आहे. चीनमध्ये या व्हेरियंटमुळे रुग्णालयं अपूरी पडू लागली असून, दिवसाला 10 हजार रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत आहेत. चीनमध्ये नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घालताच जगभरातील अनेक देश सतर्क झाले आहेत.
भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच आणखी एका घातक व्हेरियंटचा धोका निर्माण झाला आहे. हा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या BF.7 पेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. आता कोविड-19 चा नवीन प्रकार XBB15 चा धोका सतावत आहे. हा व्हेरियंट भविष्यात मोठ्या प्रमाणात पसरेल, असं व्हायरॉलॉजिस्ट एरिक डिंग यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, XBB15 इम्युनिटीला यशस्वीरित्या चकवतो. हा व्हेरियंट BQ आणि XBB व्हेरियंटपेक्षा वेगाने संसर्ग पसरवतो आणि तो धोकादायक आहे. याशी संबंधित डेटा सूचित करतो की याला सुपर व्हेरिएंटदेखील म्हटलं जाऊ शकतं. अमेरिकेत 40 टक्क्यांपर्यंत हा व्हेरियंट पसरला आहे. त्यामुळे रुग्णालयं रुग्णांनी खचाखच भरलेली आहेत. या व्हेरियंटची व्युत्पत्ती अमेरिकेतच झाल्याचं कळतंय.
हे ही वाचा : भारतातील कोरोना परिस्थिती, पुढचे 40 दिवस कोविड संसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे...
जुन्या व्हेरियंटपेक्षा 120 टक्के वेगाने पसरतो
एरिक डिंग यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की XBB15 सध्याच्या सर्व व्हेरियंटपेक्षा अधिक घातक आहे. तो आर-व्हॅल्यू खूप वेगाने पसरवतो आणि त्याचं संक्रमण जुन्या व्हेरियंटपेक्षा खूप जास्त वेगाने होत आहे. जुन्या BQ1 व्हेरियंटपेक्षा ते 108 टक्के वेगवान असल्याचंही डिंग म्हणाले. तर, त्याच्याशी संबंधित नवीन डेटा तो 120 टक्के वेगवान असल्याचे दर्शवत आहे.
नव्या व्हेरियंटने अमेरिकेत माजवला हाहाकार
डिंग यांच्यामते, कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट XBB15 ला येऊन फार काळ झालेला नाही. कारण, गेल्या आठवड्यापर्यंत याबाबत कोणतीही बातमी नव्हती. मात्र, काहींनी असाही आरोप केला आहे की, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होऊनही अमेरिकेने योग्य आकडे लपवले. त्यांनी सांगितलं की त्यांनी आधीच XBB बद्दल सूचक इशारा दिला होता. तसंच हा व्हेरियंट सिंगापूरमध्ये आढळून आल्याचंही सांगितलं होतं.
हे ही वाचा : BF.7 व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही! तज्ज्ञ काय म्हणताय...
परंतु, XBB15 हा अमेरिकेतून आलेला व्हेरियंट आहे आणि तो XBB पेक्षा 96 टक्के वेगवान आहे. XBB15 पहिल्यांदा न्यूयॉर्क शहरात ऑक्टोबरमध्ये आढळला होता. तेव्हापासून या व्हेरियंटने इथं दहशत माजवली आहे. सध्या अमेरिकेत या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Corona updates, Corona virus in india, Coronavirus