मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कोरोनामुक्त कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात! कोव्हिड नाही पण जखडतोय विचित्र सिंड्रोम

कोरोनामुक्त कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात! कोव्हिड नाही पण जखडतोय विचित्र सिंड्रोम

कोरोनामुक्त कुटुंबातील कोरोना निगेटिव्ह लहान मुलांमध्येही मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem inflammatory syndrome-MIS-C) ची लक्षणं दिसून येत आहेत.

कोरोनामुक्त कुटुंबातील कोरोना निगेटिव्ह लहान मुलांमध्येही मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem inflammatory syndrome-MIS-C) ची लक्षणं दिसून येत आहेत.

कोरोनामुक्त कुटुंबातील कोरोना निगेटिव्ह लहान मुलांमध्येही मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem inflammatory syndrome-MIS-C) ची लक्षणं दिसून येत आहेत.

मुंबई, 21 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Corona second wave) यशस्वीरित्या सामना करत असलेल्या महाराष्ट्राचं (Coronavirus in Maharashtra) देशभर कौतुक होतं आहे. केंद्रानेही महाराष्ट्राने कोरोनावर मिळवलेल्या नियंत्रणाला दाद दिली. एकिकडे हा सर्वात मोठा दिलासा असताना आता मात्र महाराष्ट्रासमोर कोरोनामुक्त कुटुंबाच्या चिमुकल्यांवर (Children in Covid-recovered families show symptoms of MIS-C)  ओढावलेलं आरोग्याचं नवं संकट आ वासून उभं राहिलं आहे. कोरोनामुक्त झालेल्या कुटुंबातील लहान मुलांना विचित्र समस्या (MIS-C In children) बळावते आहे आणि ती म्हणजे मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem inflammatory syndrome-MIS-C).

राज्यातील बहुतेक भागात कोरोना मुक्त झालेल्या कुटुंबातील लहान मुलांमध्ये एमआयएस-सी लक्षणं (symptoms of MIS-C) दिसायला सुरुवात झाली आहे. नागपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणामध्ये अशी प्रकरणं आढळून आली आहेत. या सिंड्रोमची लक्षणं असलेले  2-12 वयोगटातील मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपुरात सर्वाधिक सहा रुग्ण आहेत, अशी माहिती मिळते आहे.

बालरोगतज्ज्ञ आणि यवतमाळमधील IMA चे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कुटुंबातील मुलांमध्ये कदाचित कोव्हिड अँटिबॉडीज तयार झाल्या असाव्यात आणि त्यामुळे त्यांना एमआयएस-सी होतो आहे.

हे वाचा - देशात ब्लॅक फंगसचा कहर, 5500 प्रकरणं समोर; एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के मृत्यू

MIS-C ची लक्षणं ही कावासाकी आजारासारखीच आहेत. यामध्ये अवयव आणि टिश्यूंना सूज येते. ताप, श्वास घ्यायला त्रास, पोटात वेदना आणि त्वचा, नखांचं रंग निळसर होणं अशी लक्षणं यामध्ये दिसून येत आहे. लहान मुलाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरी त्याच्यामध्ये अशी लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या पालकांनी आपल्या मुलांमध्ये अशी काही लक्षणं तर दिसत नाहीत ना याकडे लक्ष द्यावं असा सल्ला देण्यात आला आहे. किमान एक महिना तरी मुलांची काळजी घ्यायला हवी. लवकरात लवकर या सिंड्रोमचं निदान झालं तर त्यावर उपचार करून तो बरा होऊ शकतो.

लहान मुलांसाठीही धोकादायक ठरते आहे कोरोनाची दुसरी लाट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भारतात लहान मुलांनाही आपल्या विळख्यात (Coronavirus in children) घेतलं आहे. मोठ्या संख्येने लहान मुलं संक्रमित होत आहेत. यामुळेच कोरोना काळात आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स (Covid-19 guidelines for kids) जारी केल्या आहेत. कोरोनाग्रस्त लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या होम आयसोसेलेशन आणि उपचारासंबंधी प्रोटोकॉल काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केला होता.

हे वाचा - मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित

दरम्यान लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता धोका पाहता त्यांनाही लवकरच कोरोना लस दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus, Parents and child, Rare disease