मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर; 5500 प्रकरणं आली समोर, एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के मृत्यू

देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर; 5500 प्रकरणं आली समोर, एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के मृत्यू

देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे (Fungul Infection) आतापर्यंत तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत.

देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे (Fungul Infection) आतापर्यंत तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत.

देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे (Fungul Infection) आतापर्यंत तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 मे: कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases) काही प्रमाणात घट येऊ लागल्यानं दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसनं (Black Fungus) चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे (Fungul Infection) आतापर्यंत तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे या इन्फेशनमुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यातही महाराष्ट्र (Maharashtra) पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत पाच राज्यांनी याला महामारी घोषित केलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की अनेक राज्य या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बीच्या तुटवड्याचा सामना करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, देशात सध्या जवळपास 5500 रुग्ण ब्लॅक फंगसच्या विळख्यात आले आहेत. यातील 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 90 लोकांनी या फंगल इन्फेक्शनमुळे आपला जीव गमावला आहे. तर, हरियाणा 14 आणि उत्तर प्रदेशमध्ये 8 रुग्णांनी या इन्फेक्शनमुळे जीव गमावला आहे. नुकतंच बिहारच्या पाटणामग्ये ब्लॅकनंतर आता व्हाईट फंगसचे रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे, चिंतेत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे.

राजस्थाननंतर आता गुरुवारी गुजरातनंदेखील या आजाराला महामारी घोषित केलं आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांनी साथीचा आजार अधिनियमांतर्गत हा एक उल्लेखनीय आजार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर म्यूकरमायकोसिसचं प्रत्येक प्रकरणाची माहिती या राज्यांतील राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक झालं आहे.

रिपोर्टमधून असं समोर आलं आहे, की दिल्ली, तेलंगणा, ओडिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळसह कमीत कमी दहा राज्यांनी असं म्हटलं आहे, की या आजारावरील उपचारासाठी त्यांच्याकडे औषधं शिल्लक नाहीत किंवा स्टॉक अतिशय वेगानं कमी होत आहे. दुसरीकडे देशातील ब्लॅक फंगसच्या एकूण बळींपैकी 70 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. इथे ब्लॅक फंगसची 1500 हून अधिक प्रकरणं आढळली आहेत.

महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की राज्याला 1.50 वायल्सची गरज आहे. मात्र, केंद्रानं केवळ 16 हजार वायल उपलब्ध करुन दिल्या आहेत.

First published:

Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus