मुंबई, 23 ऑगस्ट: सध्याच्या काळात रक्तदाब व डायबेटिस या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. डायबेटिसमुळे इतरही अनेक समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणाबाहेर वाढलं, तर त्यातून शरीरातील इतर अवयवांवर दुष्परिणाम होतात. डायबेटिसमुळे डोळे, किडनी व हृदयरोगाचा धोका वाढतो. डायबेटिस पेशंटसाठी आहारातील पथ्य हा एक प्रभावी उपचार असतो. असं म्हणतात, की डायबेटिसच्या नियंत्रणासाठी 80 टक्के काम फक्त आहारच करतो. म्हणूनच डॉक्टरही डायबेटिसच्या रुग्णांना काटेकोरपणे काही पथ्य पाळण्याचा सल्ला देतात. पथ्य पाळणं म्हणजे केवळ काही पदार्थांना जेवणातून वगळणं किंवा कमी करणं हे नाही, तर पौष्टिक व पूरक पदार्थांचा आहारात समावेशही करावा लागतो. डायबेटिसच्या रुग्णांना उपयोगी पडतील अशी काही हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्स कशी तयार करता येतील, याबाबत इंडिया डॉट कॉमनं वृत्त दिलं आहे. डायबेटिस पेशंटच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास या डिटॉक्स पेयांचा खूप उपयोग होतो. ही पेयं घरच्याघरी सहज तयार करता येतात. आल्याचं पाणी – आलं हे अतिशय औषधी कंदमूळ आहे. सर्दी, खोकला, पोटदुखी यासाठी आलं गुणकारी ठरतं. यामध्ये असलेल्या झिंक या घटकामुळे शरीरात इन्सुलिन स्रवण्यासाठी मदत होते. त्याशिवाय यात अॅन्टी ऑक्सिडंट्स व अँटिइन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आलं घालून उकळलेलं पाणी मधुमेहासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी एक भांड पाण्यात आलं किसून घाला. ते उकळा व गाळून प्या. मेथीचं पाणी – मधुमेहासाठी मेथीचे दाणे उपयुक्त असतात. इन्सुलिन शरीरात व्यवस्थित तयार होत नसेल किंवा शोषलं जात नसेल, तर त्यासाठी मेथीचे दाणे गुणकारी असतात. त्यासाठी रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी उकळून व गाळून प्या. हेही वाचा - Alcohol And Cholesterol : खरंच दारूमुळे कंट्रोलमध्ये राहतं का कोलेस्टेरॉल; याचा काय आहे संबंध? तुळशीचं पाणी – तुळशीमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. तुळशीलाच बेसिल असंही म्हटलं जातं. तुळस अनेक रोगांवर उपाय म्हणून वापरली जाते. तुळशीची 6-8 पानं एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी गरम किंवा थंड पिऊ शकता. दिवसभरात कधीही हे पाणी पिता येतं. कडुनिंबाचं पाणी – कडुनिंब अनेक आजारांवरचा इलाज आहे. त्वचा, पोटाचे विकार तसंच मधुमेहासाठी कडुनिंब खूप उपयोगी आहे. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटिइन्फ्लमेटरी आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे रक्तातील साखर प्रमाणात राहते. त्यासाठी कडुनिंबाची 7-8 पानं एक ग्लास पाण्यात उकळावीत व हे पाणी प्यावं. हे पाणी अत्यंत कडू लागलं, तरी तब्येतीसाठी उत्तम असतं. दालचिनीचं पाणी - पॅनक्रियाज या अवयवामधून इन्सुलिन स्रवण्यासाठी दालचिनी (Cinnamon Water) फायदेशीर असते. त्यामुळे साखरेचं विघटन होण्यास मदत होते. एक चमचा दालचिनी पूड एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी प्या. यामुळे साखर नियंत्रित राहण्यासाठी फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.