मुंबई, 31 डिसेंबर : शाकाहारी लोकांच्या आहारात प्रोटिन (Protein) जास्त मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत यावर बरेचदा चर्चा होते. मुगाची डाळ (Moong Dal) हा प्रोटिनचा एक सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तर मांसाहारी लोक मात्र चिकनला (Chicken) प्रोटिनचा उत्तम स्रोत मानतात. दोन्हीपैकी नेमकं कशातून प्रोटिन म्हणजेच प्रथिनं जास्त मिळतात याबद्दलचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे.
कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) कमी प्रमाण
चिकनच्या तुलनेत मुगामध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे शुगर कंट्रोल (Sugar Control) अर्थात साखरेचं नियंत्रण करण्यात मूग किंवा मूग डाळ जास्त परिणामकारक ठरतात. तसंच मुगामध्ये कॅल्शियम (Calcium), डाएटरी फायबर (Dietary Fiber) आणि आयर्न (Iron) म्हणजेच लोहाचं उत्तम स्रोत मानले जातात. चिकन आणि मूग दोन्हींमध्ये प्रोटिनचं प्रमाण भरपूर असतं. 100 ग्रॅम चिकनमध्ये 23.3 ग्रॅम प्रोटिन असतं तर मुगामध्ये 23.9 ग्रॅम प्रोटिन असतं. चिकनमध्ये 0.09 ग्रॅम ट्रान्स फॅट असतं. मात्र मुगात हे फॅट अजिबात नसतं.
वाचा : ब्रेकफास्टमध्ये काय खावं, ओट्स की कॉर्नफ्लेक्स?; जाणून घ्या
व्हिटॅमिनचं भरपूर प्रमाण
चिकनच्या तुलनेत मुगामध्ये जास्त व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि ए (Vitamin A) असतं. तर व्हिटॅमिन ई (Vitamin E) चिकन आणि मूग या दोन्हीमध्ये सारख्याच प्रमाणात असतं. या दोन्हींमध्ये K व्हिटॅमिन सारख्याच प्रमाणात असतं.
कॅलरी, कार्ब आणि फॅट
चिकन आणि मूग दोन्हीमध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. मुगात चिकनच्या तुलनेत 84 टक्के अधिक कॅलरीज असतात. चिकनमध्ये कार्ब्जचं प्रमाण जास्त असतं. तसंच चिकनमध्ये फॅटही जास्त असतं. मात्र मुगात फक्त 3 टक्के फॅट असतं. मुग हे फायबरचा उत्तम स्रोत आहेत आणि चिकनच्या तुलनेत मुगामध्ये जास्त फायबर असतं.
वाचा : लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम
वजन कमी करण्यासाठी हिरवे मुग उपयुक्त
हिरव्या मुगात असलेल्या गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) हिरवे मुग अगदी उपयुक्त मानले जातात. हिरव्या मुगामुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. मुगामध्ये थायमिन आणि फॉलेट जास्त असतं. तर चिकनमध्ये नियासिन आणि व्हिटॅमिन बी 12 जास्त असतं.
मूग आणि शिजवलेल्या चिकनची तुलना केली तर मुगामध्ये चिकनच्या तुलनेत कमी कोलेस्ट्रॉल असतं. चिकन आणि मूग या दोन्हीमध्ये कॅलरी, पोटॅशियम आणि प्रोटिनचं प्रमाण जास्त असतं. पण मुगात चिकनच्या तुलनेत 7.9 पट कमी सच्युरेटेड फॅट असतं.
त्यामुळे मांसाहार खाणाऱ्या लोकांसाठी चिकन हा प्रोटिनचा उत्तम स्रोत आहे तर शाकाहारी लोकांसाठी मुगाचा पर्याय सर्वोत्तम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chicken, Health, Health Tips