रायपूरच्या बालाजी रुग्णालयात मुलगी जन्मली तर रुग्णालयात एकही रुपया द्यावा लागणार नाही. उत्तम पाऊल, रुग्णालयाशीसंबंधित सर्वांचे आभार. असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हे वाचा - 'पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही...', प्रसूतीआधी करीना कपूर झाली व्यक्त या रुग्णालयात मुलगी जन्मली तर तिच्या कुटुंबाकडून उपचाराचा एकही रुपया न घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासानानं घेतला आहे. सिझेरियन किंवा नॉर्मल डिलीव्हरी झाली तरीदेखील कोणतंच बिल आकारलं जाणार नाही. 15 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. हे वाचा - पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई; मन हेलावणारा VIDEO 15 फेब्रुवारीला श्री बालाजी हॉस्पिटलला 12 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं रुग्णालयानं हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. मुलींचा जन्मदर वाढावा. मुलींना तितकंच महत्त्व दिलं जावं जितकं मुलांना दिलं जातं. यासाठीच या रुग्णालयानं पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.रायपुर के ‘बालाजी अस्पताल’ में बेटी का जन्म होगा, तो अस्पताल में 1 रुपया भी नहीं लगेगा.
अद्भुत कदम. अस्पताल से जुड़े सभी महानुभावों का शुक्रिया.👌👏👍 — Awanish Sharan (@AwanishSharan) February 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beti bachao beti padhao, Chhattisgarh, Save girl life, Small baby