जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही...', डिलीव्हरीआधी करीना कपूर झाली व्यक्त

'पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही...', डिलीव्हरीआधी करीना कपूर झाली व्यक्त

'पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही...', डिलीव्हरीआधी करीना कपूर झाली व्यक्त

अभिनेत्री करीना कपूरच्या (Kareena kapoor) प्रेग्नन्सीचा नववा महिना सुरू आहे. काही महिन्यांतच तिची डिलीव्हरी होणार आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 फेब्रुवारी : काही दिवसांतच अभिनेत्री करीना कपूरची (Kareena kapoor) डिलीव्हरी होणार आहे. तिला सध्या नववा महिना सुरू आहे. करीना कपूर आता आपल्या या दुसऱ्या प्रसूतीसाठी (kareena kapoor pregnancy) तयार झाली आहे. करीना दुसऱ्यांदा आई होते आहे. आई होतानाचा पहिला आणि आताचा अनुभव तिनं मांडला आहे. पहिल्या प्रेग्नन्सीवेळी काय अवस्था होती आणि आता दुसऱ्या प्रेग्नन्सीत काय वाटतं आहे याबाबत ती व्यक्त झाली. करीनानं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं आपल्या प्रेग्नन्सीबाबत सांगितलं आहे. करीना म्हणाली, मला वाटतं मी यावेळी जास्तीत जास्त तयार आहे आणि खूप मजबूत आहे. जेव्हा मी पहिल्यांदा आई होणार होते तेव्हा खूप नव्हर्स होते. पण आता मी खूप शांत आहे आणि सुदैवानं मला भीती नाही वाटत आहे.

जाहिरात

दोन दिवसांपूर्वीच करीनानं प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यातील आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओत पाहू शकता करीनाच्या चेहऱ्यावरचा ग्लो कायम आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चिंता नाही. उलट ती आनंदात, उत्साही आणि बिनधास्त दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करतानाही करीनानं कॅप्शन दिलं आहे. नववा महिना आणि अधिक स्ट्राँग होते आहे. प्रेग्नन्सीतही करीना काम करत होती. याबाबत बोलताना तिनं सांगितलं, “प्रेग्नंट महिला काम करू शकत नाहीत? मला हे समजत नाही. मी माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये काम केलं आणि डिलीव्हरीनंतरही करत राहणार आहे. खरंतर अॅक्टिव राहणं खूप फायदेशीर असतं. यामुळे तुमच्या मुलाचं आरोग्य चांगलं राहतं. मला यावेळी कोणतीही दुजाभावाचा सामना करावा लागला नाही, असं ती म्हणाल्याचं वृत्त आज तक नं दिलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बाळानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या बाळाची उत्सुकता सर्वांना आहे. सैफ अली खाननं करीनाची डिलीव्हरी फेब्रुवारीत होईल असं सांगितलं होतं. तसंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपण दोघंही नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण दुसरं मूल ही मोठी जबाबदारी आहे. त्यासोबत थोडी भीतीही वाटते आहे, असंही तो म्हणाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात