मुंबई, 07 फेब्रुवारी : माणूस असो किंवा पशूपक्षी. त्यांच्यातील आईची (mother) ममता ही सारखीच. माणसांमध्ये महिला म्हणून भले तिला कुणी कितीही नाजूक, कमजोर, सौम्य हृदयाची म्हटलं तरी आई म्हणून जेव्हा तिच्या मुलांवर संकट येतं तेव्हा ती संपूर्ण जगाशी लढते, कुणावरही ती भारी पडू शकते. भले यावेळी तिचा जीव गेला तरी चालेल. मुक्या जीवांमध्येही अगदी तसंच. जेव्हा त्यांच्या पिल्लांवर संकट येतं तेव्हा आपल्यापेक्षा बलाढ्या, शक्तिशाली प्राण्यांशीही ते लढू शकता किंवा आपला जीव त्यांच्यासमोर देऊन आपल्या पिल्लांचा जीव वाचवतात. अशाच एका हरणाचा (deer) व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
एका हरिणीनं आपल्या पाडसाचं जीव वाचवण्यासाठी काय केलं ते पाहाल तर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी ती स्वतः मगरीच्या (crocodile) जबड्यात गेली.
All the forces on this planet will never beat that of a mother’s love 💕 The video of a mother deer that ran in to save her young from the jaws of a crocodile... pic.twitter.com/4uKMhEuyHE
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 6, 2021
व्हिडीओत पाहू शकता. हरणाचं पाडस नदीत उड्या मारत दुडूदुडू पळत सुटतं. नदीत आपल्यासमोर मोठं संकट आहे, याची कल्पनाही त्याला नाही. त्याची आई त्याच्या मागे आहे. तिला आपल्या पिल्लावर येणाऱ्या संकटाची जाणीव होते आणि मग काय क्षणाचाही विलंब न करता ती धावत सुटते.
पाडस ज्या नदीत धावत गेलं. त्या नदीतील मगर त्या पाडसाला पाहताच त्याच्या दिशेनं वेगानं येत असतं. हरिणीला हे दिसतं आणि ती पाण्यात धावत येते. तुम्ही पाहाल तर ती पिल्लाला अडवण्यासाठी किंवा त्याला बाजूला करण्यासाठी त्याच्याजवळ जात नाही किंवा त्याच्या मागेही धावत नाही. तर त्याच्यापासून दूर राहून त्याच्या बाजूनं धावण्याचा प्रयत्न करते.
हे वाचा - Shocking! पाहता पाहता निर्जीव पुतळे बनले जिवंत प्राणी; VIDEO पाहूनच हादराल
ती असं का करते याचं तुम्हाला थो़डं पुढे गेल्यावर कळेल. आपली आई आणि आपला शिकार करायला आलेली मगर आपल्या जवळ आहे, याची कल्पना त्या पाडलाही नाही. ते आपलं मस्त आपल्याच नादात खेळत जात असतं. आई पाडस आणि मगरीमध्ये एक भिंत बनून शांतपणे उभी राहते. पाडसाकडे एकटक पाहत राहते. पाडसापासून आता आपण दुरावणार याची कल्पना तिला असते. त्यामुळे त्याला ती शेवटचं पाहून घेते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असलेला भाव स्पष्टपणे दिसतो.
काही क्षणात मगर त्या हरिणीला आपल्या जबड्यात घेतो. हरिण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही कारण तिनं मुद्दामहून आपला जीव धोक्यात टाकलेला आहे. जेणेकरून आपल्या पाडसाचा जीव वाचेल. पाडस सुखरूपपणे पाण्यातून बाहेर पडतं.
हे वाचा - चक्क कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं ठोकली धूम; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. संपूर्ण जगाची ताकद आईच्या प्रेमासमोर हरते. या व्हिडीओत आई आपल्या पिल्लाला मगरीच्या जबड्यातून वाचवण्यासाठी धावत सुटते, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral, Viral videos