नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : कॅन्सरचे नाव येताच मनात अशा आजाराची प्रतिमा तयार होऊ लागते, जी जीवघेणी असते आणि योग्य वेळी कॅन्सर डिटेक्ट न झाल्यास उपचार करणे जवळपास अशक्यच होते. कर्करोगाचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि या आजारासाठी कोणतेही एक वय नाही. कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी लठ्ठपणा, धूम्रपान आणि आपली चुकीची जीवनशैली यामुळेही त्याचा धोका वाढतो. हिंदुस्तान टाईम्स च्या बातमीनुसार, कर्करोगाच्या आजारामागे वय हाही एक प्रमुख घटक आहे. गेल्या काही वर्षांत भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एका अहवालानुसार, 2020 मध्ये भारतात सुमारे 1,392,179 लोकांना कर्करोग झाला होता आणि 2025 मध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक संशोधनानुसार, कर्करोगाच्या रुग्णांच्या या संख्येतील बहुतेक प्रकरणे फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि जीभेच्या कर्करोगाची होती. कर्करोग सांख्यिकी अहवाल 2020 नुसार, पुरुषांमध्ये अंदाजे प्रकरणे 2020 साठी प्रति 100,000 व्यक्तींमागे 94.1 आणि महिलांसाठी 103.6 प्रति 100,000 होती. हे वाचा - डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर कर्करोग लहान मुलांनाही होतो - कर्करोग हा असा एक आजार आहे जो विशिष्ट लिंग किंवा वयापर्यंत मर्यादित नाही. हा आजार लहान मुलांनाही होऊ शकतो. कर्करोगाच्या आजाराला वयाची मर्यादा नसली तरी वैद्यकीय शास्त्रानुसार वयाच्या 62 व्या वर्षी स्तनाचा कर्करोग, वयाच्या 67 व्या वर्षी कोलोरेक्टल कर्करोग, वयाच्या 71 व्या वर्षी फुफ्फुसाचा कर्करोग, वयाच्या 66 व्या वर्षी प्रोस्टेट कर्करोग. अंडाशयातील कर्करोग वयाच्या 50 व्या वर्षी आणि गर्भाशयाचा कर्करोग वयाच्या 63 व्या वर्षी होण्याची शक्यता असते. हे वाचा - तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे? गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर 30 वर्षांच्या तरुणींनाही स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. याशिवाय अनेक मुल हाडांचा कर्करोग, ल्युकेमिया किंवा लिम्फोमाशी झुंज देत असल्याचे दिसून आले आहे. कधी कधी आपलाच बेफिकीरपणाही कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देते. धुम्रपानाबद्दल जागरुक नसणे, झपाट्याने वाढते प्रदूषण आणि सूर्याची अतिनील किरणंही कॅन्सरला आमंत्रण देतात. तुमचे वय 70 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. हे टाळण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.