मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

  सर्वच पालकांना त्यांच्या मुलाला चांगलं आयुष्य जगताना पाहायचं असतं, यासाठी त्यांना मुलांच्या संगोपनात काहीच कमी पडू द्यायचं नसतं. मुलाचं संगोपन त्याच्या जन्मापासून सुरू होतं.

सर्वच पालकांना त्यांच्या मुलाला चांगलं आयुष्य जगताना पाहायचं असतं, यासाठी त्यांना मुलांच्या संगोपनात काहीच कमी पडू द्यायचं नसतं. मुलाचं संगोपन त्याच्या जन्मापासून सुरू होतं.

सर्वच पालकांना त्यांच्या मुलाला चांगलं आयुष्य जगताना पाहायचं असतं, यासाठी त्यांना मुलांच्या संगोपनात काहीच कमी पडू द्यायचं नसतं. मुलाचं संगोपन त्याच्या जन्मापासून सुरू होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 16 सप्टेंबर-   सर्वच पालकांना त्यांच्या मुलाला चांगलं आयुष्य जगताना पाहायचं असतं, यासाठी त्यांना मुलांच्या संगोपनात काहीच कमी पडू द्यायचं नसतं. मुलाचं संगोपन त्याच्या जन्मापासून सुरू होतं. चालायला शिकणं, पडणं-उठणं, काहीतरी खाणं या छोट्या-छोट्या गोष्टींपासून पालक मुलाच्या भविष्याची तयारी करू लागतात. अनेक पालकांना आपल्या मुलाला स्वावलंबी होताना पहायचं असतं, तर असे अनेक पालक असतात, ज्यांना नेहमीच मुलाचा आधार बनण्याची इच्छा असते. त्यासाठी ते मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वास्तविक जीवनात हे शक्य नसतं.

तुम्ही तुमच्या मुलांसोबत नेहमी उपस्थित राहू शकत नाही. अशा परिस्थितीत, आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, आपण ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ करत आहात की, नाही याची माहिती असणं आवश्यक आहे. शिवाय हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ काही वेळा जाणीवपूर्वक असतं तर काही वेळा पालक मुलांच्या काळजीपोटी नकळत हेलिकॉप्टर पालक बनत असतात. त्यामुळे या दोन्हीतला फरक पालकांना माहीत असणं आवश्यक आहे. आज ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’, त्याचे फायदे आणि नुकसान तसंच या पासून सुटका कशी करायची, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर समजवून सांगणार आहोत.

कोण असतात ‘हेलिकॉप्टर पेरेंट्स’?

जे पालक आपल्या मुलांच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतात त्यांना ‘हेलिकॉप्टर पॅरेंट्स’ असं म्हणतात. हेल्थलाइनच्या मते, या प्रकारच्या पालकत्वाला ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ किंवा ‘कॉसेटिंग’ म्हणतात. हा शब्द पहिल्यांदा 1969 मध्ये वापरला गेला होता. डॉ. हेम गिनोट यांनी त्यांच्या 'बिटवीन पेरेंट अँड टीनएजर' या पुस्तकात 'हेलिकॉप्टर पेरेंटिंग' हा शब्द वापरला होता.

काही पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी असते, म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीत मुलाला मदत करायची असते आणि ते करतातदेखील. ते गरजेपेक्षा जास्त मुलांची काळजी घेतात आणि नेहमी मुलांची प्रगती व्हावी, त्यांनी पुढे जावं, यासाठी मार्ग शोधत असतात. तसंच मुलाला प्रत्येक समस्येपासून वाचवण्यासाठी ते स्वतःच सर्वकाही करू इच्छितात, म्हणजेच ते प्रत्येक कामात मुलांना स्पूनफीड करण्यास सुरुवात करतात. यालाच ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ म्हणतात.

(हे वाचा:वंध्यत्व असलेल्या पुरुषांसाठी वरदान ठरेल 'हे' तंत्रज्ञान )

‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’चे फायदे

तुम्हाला प्रश्न पडेल की मुलाची काळजी घेण्यात किंवा मदत करण्यात काय चूक आहे? खरं तर, मुलांना हेलिकॉप्टर पेरेंटिंगमुळे कोणताच फायदा होत नाही. रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलंय की पालकांच्या जास्त हस्तक्षेपामुळे मुलासाठी शाळा-कॉलेजमध्ये किंवा नंतरच्या आयुष्यात समस्या उद्भवू शकतात.

‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’चे तोटे

- अशा प्रकारच्या पॅरेंटिंगुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

- मुलाचा स्वाभिमान विकसित होत नाही.

- मुलं स्वतः कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत.

- मुलांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवता येत नाही.

- मुलं एकट्याने जबाबदाऱ्या सांभाळणं टाळतात.

एवढंच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2014 मध्ये झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ झालेल्या मुलांना तणावग्रस्त किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका जास्त होता. हा अभ्यास तुर्कस्तानमधील मर्यादित लोकांवर केला गेला होता आणि त्यातील बहुतेक महिला होत्या. त्यामुळे त्यातील तथ्यांची पुष्टी करता येत नाही.

(हे वाचा: Weight Loss Tips : मनसोक्त खाऊन घटवा वजन; फक्त आहारात सामील करा हे पदार्थ)

‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’पासून सुटका कशी करावी?

- ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’च्या दीर्घकालीन परिणामांकडे दुर्लक्ष करायला नको.

- स्वतःला विचारा की तुमच्या मुलाने प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी तुमच्यावर अवलंबून राहावं असं तुम्हाला वाटतं का?

- जर तुमचं मूल स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी पुरेसं मोठं असेल तर त्याला ते करू द्या आणि हस्तक्षेप करणं थांबवा. यामध्ये बूटांची लेस स्वतः बांधणं, खोली स्वच्छ करणं किंवा स्वतःचे कपडे निवडणं, अशा अगदी लहान गोष्टींचा समावेश असू शकतो.

- मुलांच्या वयानुसार त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या.

- तुमच्या मुलाचे मित्र , क्लासमेट्स किंवा सहकारी यांच्याशी भांडण किंवा वाद झाल्यानंतर तुम्ही त्यात पडू नका. तसंच गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला स्वतःच समस्या सोडवण्यास प्रवृत्त करा.

- मुलाला अयशस्वी होऊ द्या. हे थोडं कठीण आहे पण लवकर यश न मिळणं हे त्याला निराशेचा सामना करायला शिकवू शकतं.

अशा रितीने तुमच्या मुलासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय तुम्ही घ्या. कारण तुम्ही सतत त्याच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केल्यास तो कायम तुमच्यावर अवलंबून राहील.

First published:

Tags: Lifestyle, Personal life