मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

पोट दुखायचं निमित्त! 6 तासांच्या ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातून निघाला फुटबॉलच्या दुप्पट आकाराचा ट्युमर

पोट दुखायचं निमित्त! 6 तासांच्या ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातून निघाला फुटबॉलच्या दुप्पट आकाराचा ट्युमर

Tumor in Woman Stomach: वैद्यकीय क्षेत्रात अनेक चमत्कार घडत असतात. असाच चमत्कार म्हणावा असा प्रकार भोपाळमध्ये घडला आहे.

Tumor in Woman Stomach: वैद्यकीय क्षेत्रात अनेक चमत्कार घडत असतात. असाच चमत्कार म्हणावा असा प्रकार भोपाळमध्ये घडला आहे.

Tumor in Woman Stomach: वैद्यकीय क्षेत्रात अनेक चमत्कार घडत असतात. असाच चमत्कार म्हणावा असा प्रकार भोपाळमध्ये घडला आहे.

  • Published by:  News18 Desk
भोपाळ, 22 मार्च : मानवी शरीर हे अनेक गुंतागुंतींनी भरलेलं असतं. शरीराच्या आत काय चालू आहे याची अनेकदा खबरच लागत नाही. असाच एक प्रकार भोपाळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. (Tumor in Woman stomach) भोपाळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये  डॉक्टरांच्या टीमनं एका महिलेच्या पोटातून तब्बल 16 किलोचा ट्युमर काढला. हे गुंतागुंतीचं ऑपरेशन 6 तास सुरू होतं. ऑपरेशननंतर दोन फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर काढण्यात आला. तीन कर्मचाऱ्यांनी मिळून हा ट्युमर उचलला. (Bhopal woman tumor operation) डॉक्टरांनी सांगितलं, की ऑपरेशन वेळेत झालं नसतं तर महिलेच्या जीवालाही धोका झाला असता. आता महिलेची अवस्था ठीक आहे. पीबीजीएम हॉस्पिटलचे संचालक देवेन्द्र चंदोलिया यांनी सांगितलं, की महिलेला ओव्हरीयन ट्युमर होता. यामुळं पोट फुगत जातं. या महिलेला चालण्या-फिरण्यात आणि जेवण्यातही अडचणी येत होत्या. तिचा अंतरास सतत वाढत होता. (Bhopal woman had 16 kg tumor) हेही वाचा आजींनी घेतली कोरोना लस, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं वाचून झाल्या भावूक या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक होती. खासगी दवाखान्यात ऑपरेशन करायला अडीच लाख रुपये खर्च येणार होता. या २० वर्षीय महिलेचं वजन होतं 48 किलो. यात 16 किलो वजन ट्युमरचंच होतं. यामुळंच तिला चालण अवघड होऊन बसलं होतं. (Doctor operated 16 kg Tumor) दोन फुटबॉलइतका ट्युमर डॉ. देवेन्द्र चांदोलियानं सांगितलं, की महिलेची शस्त्रक्रिया 6 तास चालली. हा ट्युमर दुसरे अवयव आतडे, यकृत, गर्भाशयासह इतर भागांना चिकटून राहतो. त्यामुळं तो काढताना सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा अवयव डॅमेज होतात. सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर 16 किलो वजनाचा ट्युमर बाहेर काढला. तो उचलायला तीन कर्मचारी लागले. शस्त्रक्रियेत डॉ. देवेन्द्र चंदोलिया, डॉ. कृष्ण कुमार, डॉ. हिरा आरिफ डॉ. शुभम यांच्याशिवाय टेक्निशियन दुर्गेश, पिंकी, रवी, करिश्मा आणि राणी सहभागी होत्या. हेही वाचा 10 लाख दे किंवा घटस्फोट घे!कोरोना झाल्याने नर्सला काढलं घराबाहेर, आता असा पर्याय मागच्या तीन महिन्यात वेगानं वाढला आकार डॉक्टरांनी सांगितलं, की रुग्णाला दोन अडीच वर्षांपासून हा त्रास होत होता. हा ओव्हरीयन ट्युमर होता. यात पोट फुगण्यासह त्याचा आकार वाढतो. सुरवातीला या त्रासाचं कारणच कळत नव्हतं. सोनोग्राफी केल्यावर पोटातल्या गाठीबाबत समजलं. मागच्या दोन-तीन महिन्यात ट्युमरचा आकार वेगात वाढत होता.
First published:

Tags: Bhopal News, Operation, Stomach pain

पुढील बातम्या