मराठी बातम्या /बातम्या /Viral /आजींनी घेतली कोरोनाची लस, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं काही लिहिलं, की आजींचे डोळे पाणावले

आजींनी घेतली कोरोनाची लस, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं काही लिहिलं, की आजींचे डोळे पाणावले

कोरोनाच्या काळात अनेक इमोशनल सत्यकथा जगभरातून समोर येत आहेत. ही एक अशीच गोड गोष्ट

कोरोनाच्या काळात अनेक इमोशनल सत्यकथा जगभरातून समोर येत आहेत. ही एक अशीच गोड गोष्ट

कोरोनाच्या काळात अनेक इमोशनल सत्यकथा जगभरातून समोर येत आहेत. ही एक अशीच गोड गोष्ट

वॉशिंग्टन, 17 मार्च : आपण कुणालाही प्रेमानं मिठी मारतो तेव्हा एक वेगळीच जाणीव होते. अनेकदा आपण आनंदात असतो, किंवा दु:खातही. मात्र मिठी मारून खूप भावना व्यक्त करता येतात. यातून जे समाधान आणि सुरक्षितता दोन्ही व्यक्तींना मिळते ती शब्दात सांगता येणं अवघड असतं. (Emotional Story of Old Lady)

सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या व्हिडिओत एक प्रौढ महिला आपल्या नातीला भावूक होत मिठी मारते आहे. (Grandmother takes Corona Vaccine)

तसं पाहता आजच्या कोरोनाचा उद्रेक होत असलेल्या काळात सोशल डिस्टंसिंग बंधनकारक झालेलं आहे. अशावेळी एकमेकांची गळाभेट अवघड झालेली आहे.

हेही वाचा मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, अतूट नात्याची अनोखी कथा

कोरोनाची लस घेतल्यानंतर मात्र एका आजींना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर आगळाच सुंदर संदेश लिहून दिला आहे. (Doctor asks Grandmother to Hug her Granddaughter)

ही गोष्ट घडली अमेरिकेत. इथं एका आजींना कोव्हीडपासून रक्षण करणारी लस दिली गेली. त्यांचं नाव आहे एव्हलिन शॉ. त्या ८१ वर्षांच्या आहेत. त्यांना लसीचे दोन डोस दिले गेले होते. मात्र त्यानंतरही त्या आपल्या घरच्यांना भेटायला घाबरत होत्या. (Grandmother Gets Emotional to Read Prescription)

हेही वाचा MBA Chaiwala! डिग्री सोडून चहा विकतोय हा तरुण; आज करोडोमध्ये आहे कमाई

मग डॉक्टरांना हे समजलं तेव्हा त्यांनी यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्यांनी औषधांच्या चिठ्ठीवर एक संदेश लिहिला. असं काय होतं त्याच्यात? त्यावर डॉक्टरांनी लिहिलं होतं, की आता तुम्ही तुमच्या नातीला मिठी मारू शकता.

यानंतर या आजींनी हा संदेश वाचताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आपल्या नातीला गळ्याला लावून घेतलं आणि त्या एकदमच भावूक झाल्या. कारण त्यांना लाडक्या नातीला मिठी मारून तब्बल वर्ष झालं होतं. लोकांनी व्हिडिओ पाहून कमेंट्स केल्या, की हे पाहून त्यांना खूपच भावना अन्वर झाल्या आणि ते रडू लागले.

First published:

Tags: Corona, Social distancing, Vaccinated for covid 19