नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. धार्मिक महत्त्व असलेल्या या सणात अनेक प्रकारच्या मिठाई घरोघरी तयार करून प्रियजनांचेही तोंड गोड केले जाते.
पण तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थ असे आहेत, ज्यांच्याबद्दल अशी मान्यता आहे की, हे गोड पदार्थ त्या विजयादशमीच्या दिवशी खाल्ल्यास येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळते.
जिलेबी-फाफडा : दसर्याच्या दिवशी जिलेबी आणि बेसनाचा फाफडा हे गुजराती गोड पदार्थ खाल्ल्यास पुढील वर्षापर्यंत तुम्हाला गुडलक मिळते, असे मानले जाते. यासोबतच हे दोन्ही पदार्थ खायला खूप चविष्ट आहेत.
रसगुल्ला : गोड पदार्थ रसगुल्ला अनेकदा खास प्रसंगी खाल्ला जातो. पश्चिम बंगालमध्ये रसगुल्ला गुडलकशीही जोडला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने रसगुल्ला खाणे शुभ मानले जाते.
पान : आपल्याकडे अनेक भागात खास प्रसंगी पान खाण्याची परंपरा आहे. याचा शुभाशीही संबंध आहे. विशेषतः यूपी, बिहारमध्ये याचा विशेष वापर केला जातो. हनुमानजींच्या चरणी पानही अर्पण केले जाते.
दही : भारतीय घरांमध्ये कोणत्याही शुभ प्रसंगी साखर घालून दही खायला देण्याची परंपरा आहे. यामुळे गुडलक मिळते आणि हे शुभ असते असे मानले जाते. ओडिशात रावण दहन प्रसंगी भात आणि दही देतात.
गोड डोसा : दक्षिण भारतात दसरा आणि सरस्वती पूजेच्या निमित्ताने गोड डोसा परमेश्वराला अर्पण केला जातो. विजयादशमीच्या दिवशी ते खाणे खूप शुभ मानले जाते.