नवी दिल्ली, 05 जानेवारी : वयानुसार सगळ्यांचेच केस पांढरे होतात. मात्र, कमी वयात केस पांढरे व्हायला लागल्यानंतर टेन्शन वाढायला लागतं. पांढऱ्या केसांमुळे बाहेर वावरतांना थोडं अवघडल्यासारखं वाटतं. त्यामुळेच पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलर्स वापरले जातात. केस काळे करणाऱ्या हेअर कलर्समध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे केसांच्या समस्या आणखीन वाढतात. बदलेली लाईफस्टाईल, जेवणातील भेसळ, केमिकलयुक्त शॅम्पू**,** हेअर कलर आणि तेल यांच्या वापरामुळे केस लवकर पांढरे होतात. पण, काही घरगुती उपायांचा वापर करून पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते. जाणून घेऊयात या तेलांची माहिती. खोबरेल तेल आणि मेहेंदीची पानं पाढंऱ्या केसांपासून सुटका हवी असेल तर, खोबरेल तेल आणि मेहंदीच्या पानांचा उपयोग करा. मेहंदीच्या पानांमुळे केसांन लाल किंवा चॉकलेटी रंग मिळतो. या तेलाने केसांची मुळं चॉकलेटी व्हायला लागतात. मेहंदीचा हा कलर केसांच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम खोबरेल तेल करतं. यासाठी 3 ते 4 चमचे नारळाच्या तेलामध्ये मेहंदीची पानं टाकून चांगलं उकळून घ्या. तेलाचा रंग चॉकलेटी होईपर्यंत तेल उकळवा. तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावा. साधारण 40 मिनिटं हे तेल केसांवर राहू द्या. त्यानंतर स्वच्छ धुवा. हे तेल नियमित वापरल्यास हळूहळू केस काळे होतील. एरंडेल तेल आणि मोहरी तेल - एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. केस तुटण्याचा त्रास कमी होतो. तर, मोहरी किंवा राईच्या तेलामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि कॅल्शियम असतं. ज्यामुळे केस मजबूत होतात. केसांना चांगलं पोषण मिळालं की केस काळे व्हायला लागतात. यासाठी 2 चमचा मोहरी तेलामध्ये 1 चमचा एरंडेल तेल मिक्स करा. हे मिश्रण काही सेकंद गरम करा. थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी लावून 10 मिनिटं मालिश करा. 45 मिनिटं तसंच राहू द्या. चांगल्या शॅम्पूने धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून 3 वेळा केला तरी चालेल. खोबरेल तेल आणि आवळा - केस काळे करण्यासाठी 3 चमचे घट्ट खोबरेल तेलामध्ये 2 चमचे आवळा पावडर मिक्स करा. तेल आणि आवळा पावडर चांगल्याप्रकारे एकत्र होईपर्यंत हे तेल गरम करा. तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी मालिश करा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने स्वच्छ धुऊन टाका. आवळ्यात विटामिन सी असल्याने कोलेजन वाढवण्याची क्षमता असते. कोलेजन केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. नवीन केस येण्यासाठी देखील याचा फायदा होतो.
ऑलिव्ह ऑईल आणि कांद्याचं तेल कांद्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांचं मिश्रण पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम संपवेल. केस काळे करण्याबरोबरच केसांचं पोषण होऊन, चमक येऊन केस मजबूत होतात. हे तेल करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. एका भांड्यात एक मोठा चमचा कांद्याचं तेल घ्या. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी मालिश करा. एक तासनंतर कोमट पाण्याने धुऊन टाका हा उपाय दररोजही केला जाऊ शकतो. हे वाचा - घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात? घरीच हे उपाय करून मिळवा सुटका (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)