अनेकांना झोपताना घोरण्याची सवय असते. घोरण्याच्या या सवयीमुळे त्यांच्या जवळ असलेल्या इतरांना त्रास होऊ शकतो. तुम्ही जास्त घोरत असाल तर झोपण्याची स्थिती बदलावी. असे केल्याने घोरण्याची समस्या टाळता येते.
वजन वाढल्यामुळे देखील घोरण्याची समस्या होऊ शकते. असे असेल तर तुम्हाला तुमचे वजन कमी करावे लागेल. तसेच घोरण्याची समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी दारू पिऊ नये.
तुम्हाला जास्त घोरण्याची समस्या असेल तर तुम्ही रात्री झोपताना आणखी एक उशी वापरा. असे केल्याने तुमची घोरण्याची समस्या दूर होईल.
ऑलिव्ह ऑईल नाकात टाकल्याने श्वास घेताना येणार अडचण दूर होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकल्याने हळूहळू घोरण्याची समस्या दूर होते.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत लसणाची एक पाकळी गिळून घ्या. यामुळे तुम्हाला घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
तुम्ही घोरण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे दालचिनी पावडर घालून प्या. असे काही दिवस सतत करा. तुम्हाला फरक जाणवेल.
गावरान तुपाच्या माध्यमातून घोरण्याची समस्याही दूर करू शकता. यासाठी तूप थोडे गरम करा आणि त्यानंतर काही थेंब नाकात टाका. यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्येपासून आराम मिळेल.