मराठी बातम्या /बातम्या /heatlh /दररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना

दररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना

सलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना.

सलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना.

सलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना.

सिडनी, 20 ऑक्टोबर : सलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना. जंकफूड खाण्याची आवड अनेकांना असते. त्याची विशिष्ट चव, गंध आणि रुपामुळे या पदार्थांची (Tempting fast food) चटकही लागते. मात्र त्यावर नियंत्रण नसेल, तर काय होऊ शकतं, हे नुकत्याच एका घटनेतून दिसून आलं आहे. एका तरुणीनं सलग तीन महिने फक्त फास्ट फूड खाल्ल्याचा तिच्या (Fast food impact on fitness) फिटनेसवर इतका परिणाम झाला की पाहता पाहता तिचं वजन कमालीचं वाढलं.

कामामुळे लागली सवय

ही तरूणी फ्लाईट अटेंडंट म्हणून एका विमान कंपनीत काम करत होती. नेहमीची कामं संपल्यानंतर रिकाम्या वेळेत विमानातील पाठीमागच्या भागातील केबिनमध्ये बसून ती काही ना काही खात असे. त्यानंतर फ्लाईटचं लँडिंग झाल्यानंतर विमानतळावरील फूट कोर्टमध्ये जाऊन फास्ट फूडवर आडवा हात मारत असे. मात्र कोरोनाच्या उद्रेकानंतर विमानसेवा बंद झाल्या आणि या तरुणीची नोकरी थांबली. त्यामुळे तणावाखाली आलेल्या तरुणीला इमोशनल इटिंगची सवय जडली.

पिझ्झा आणि बर्गरवर ताव

गेल्या तीन महिन्यांपासून अस्वस्थ असणारी ही तरुणी सतत मॅकडोनल्ड कंपनीच्या उत्पादनांवर ताव मारत असे. त्याचबरोबर जे आवडेल ते फास्ट फूट ऑर्डर करत असे. या तरुणीचं तीन महिन्यात वजन इतकं वाढलं की तिच्या स्वतःच्या आईलाही ती ओळखू येईनाशी झाली. आईनं तिच्या वजनाबाबत विचारणा करेपर्यंत आपलं वजन वाढत असल्याची तिला जाणीवदेखील झाली नव्हती, हे विशेष.

हे वाचा- विचित्र! फक्त पैसे उधळण्यासाठी उभं राहिलं थिएटर, कधीच लागला नाही सिनेम

दरमहा 10 हजारांचा खर्च

कोरा नावाची ही तरुणी दरमहा 10 हजार रुपये फास्टफूडवर खर्च करत होती. मात्र तिला वेळेतच आपल्या वाढत्या वजनाची जाणीव झाली आणि तिनं थेट डाएटिशियनकडे धाव घेतली. आता फाट फूड बंद करून ती डाएटिशियनने दिलेला आहार घेत आहे. मात्र वजन जितक्या वेगाने वाढलं, तितक्या वेगाने ते कमी होत नसल्याचा अनुभव तिला येत आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, Lifestyle, Weight gain