जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / आधी वेदना झाल्या, मग पाणी आलं, नंतर दिसणंच बंद झालं; एकाच वेळी 6 जणांनी गमावली डोळ्यांची दृष्टी

आधी वेदना झाल्या, मग पाणी आलं, नंतर दिसणंच बंद झालं; एकाच वेळी 6 जणांनी गमावली डोळ्यांची दृष्टी

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एका ऑपरेशननंतर सहाही रुग्णांना दिसणं बंद झालं आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 22 नोव्हेंबर : काही लोकांना डोळ्यांच्या काही ना काही समस्या असतात. जसजसं वय वाढतं तसतसं डोळ्यांच्या समस्याही वाढतात. अशा वेळी ऑपरेशन करून डोळ्यांच्या समस्या दूर करण्याचा किंवा डोळ्यांची दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशाच ऑपरेशननंतर एकाच वेळी 6 जणांनी आपल्या डोळ्यांची दृष्टी गमावली आहे. ऑपरेशननंतर त्यांना डोळ्यांचा त्रास झाला आणि नंतर दिसणंच बंद झालं.  उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे. यूपीच्या कानपूरमधील आराध्या नर्सिंगमध्ये 2 नोव्हेंबर मोफत डोळ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.  शिवराजपूरमध्ये राहणाऱ्या या 6 रुग्णांनी आपलं मोतीबिंदूचं ऑपरेशन करवून घेतलं. ऑपरेशनच्या दिवशीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या रुग्णांना त्यांच्या गावात नेऊन सोडलं. पण त्यानंतर मात्र त्यांनी डोळ्यांची दृष्टी गमावली. हे वाचा -  अंघोळ करताना एक छोटीशी चूक आणि महिलेचा गेला जीव; बाथरूममध्ये तुम्हीही तेच करत आहात रुग्णांच्या आरोपानुसार ऑपरेशनंतरत त्यांच्या डोळ्यात वेदना होऊ लागल्या. हळूहळू डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि नंतर अचानक दिसणंच बंद झालं. त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. त्यांनी रुग्णालयात याची तक्रार दिली. तर तिथं त्यांना औषध देऊन घरी पाठवण्यात आलं. आता त्यांनी सीएमओकडे याची तक्रार केली आहे. सीएमओनी या रुग्णांची कांशीराम हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. त्यानंतर समिती गठीत करून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. हे वाचा -  डायबेटिस टाइप -1 आता तीन वर्षांसाठी रोखता येणार; औषधाला मंजुरी आज तकच्या वृत्तानुसार आराध्या आय हॉस्पिटलमध्ये आय कॅम्प लावून ग्रामीण भागातील रुग्णांचं मोतिबिंदूचं ऑपरेशन निशुल्क केलं जातं. सरकारमार्फत यासाठी निधी मिळतो. DBCS योजनेअंतर्गत सीएमओच्या परवानगीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात