मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Worst Breakfast Habits: सकाळच्या न्याहारीतील या 4 चुकांमुळे नंतर वाढते ब्लड शुगर; वेळीच बदला सवयी

Worst Breakfast Habits: सकाळच्या न्याहारीतील या 4 चुकांमुळे नंतर वाढते ब्लड शुगर; वेळीच बदला सवयी

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता

नाश्त्यामध्ये फायबरचे प्रमाण योग्य प्रमाणात घ्यायला हवे. फायबर नसेल तर त्यामुळे कार्बोहायड्रेट आपल्या रक्तप्रवाहात वेगाने विरघळू लागते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : तुम्ही ऐकले असेलच की सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. निरोगी जीवनशैलीसाठी हेल्दी नाश्ता करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकजण सकाळच्या घाईत नाश्ता करणं विसरतात आणि सरळ जेवण करणं पसंत करतात. असे अनेक लोक आहेत जे सकाळी तळलेल्या-फ्राय केलेल्या गोष्टी खाऊन पोट भरतात. पण अशा सवयींचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. EatThis च्या माहितीनुसार, आहारतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची समस्या वाढवायची नसेल, तर तुम्ही नाश्त्यामध्ये काही चुका करणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया शुगरची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्ता करताना कोणत्या गोष्टी (Worst Breakfast Habits for Blood Sugar) लक्षात ठेवायला हव्यात.

ब्रेकफास्टमध्ये या चुका करणे टाळा -

फायबर पुरेसे हवे -

नाश्त्यामध्ये फायबरचे प्रमाण योग्य प्रमाणात घ्यायला हवे. फायबर नसेल तर त्यामुळे कार्बोहायड्रेट आपल्या रक्तप्रवाहात वेगाने विरघळू लागते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर फायबरमुळे तुमची पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते. त्यामुळे 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट्ससह 1 ग्रॅम फायबरचे सेवन केल्यास चांगले होईल.

सकाळी काहीच न खाणे -

बरेच लोक घाईघाईत सकाळी उशीरापर्यंत काहीच खात नाहीत. मात्र, तुमच्या या सवयीमुळे रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. यामुळे मधुमेह टाइप 1 ची समस्या उद्भवू शकते आणि त्यामुळे हृदयविकार, मज्जातंतू, किडनी खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुमच्या या निष्काळजीपणामुळे अवयव आणि ऊतींचेही नुकसान होऊ शकते.

प्रथिने कमी खाणे -

सकाळच्या न्याहारीमध्ये फायबर जितके आवश्यक आहे, तितकेच प्रथिनांचे संतुलित सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या नाश्त्याची योजना अशा प्रकारे करा की सकाळी तुमच्या प्लेटमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, फॅट तसेच प्रथिने यांचा समावेश असेल. यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स, दही, दूध, अंडी इत्यादींचा समावेश करू शकता.

हे वाचा -  एकटेपणा जाणवतोय? ही डिप्रेशनची सुरुवात तर नाही ना? या टिप्सच्या मदतीने करा एकटेपणावर मात

हेल्दी फॅट न घेणे -

प्रथिनाप्रमाणे, हेल्दी फॅटदेखील रक्तामध्ये कार्बोहायड्रेट विरघळण्याचा दर कमी करते. ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यास देखील त्यामुळे मदत होते. अशा परिस्थितीत नाश्त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Health, Health Tips