गोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा

गोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Goa CM Doctor Pramod Sawant) यांनी काही आदेश जारी केले आहेत.

  • Share this:

पणजी (गोवा), 17 जून : गेल्या वर्षीपासून कोरोनानं (Corona virus)संपूर्ण जगभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. अगदी मोठमोठ्या कंपन्यांपासून तर पर्यटनापर्यंत (Tourism in India) सर्व व्यवसाय आर्थिक अडचणीत आहेत.मात्र आता कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होऊ लागली आहे. म्हणूनच देशातील काही राज्यांमध्ये अनलॉक (India unlock) करण्यात आलंय. त्यामुळे अनेकांना पर्यटनाचे वेध लागले आहेत. त्यात गोवा (Goa Tourism) म्हणजे तरुणाईची धडकन. मात्र जर तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन (Planning for Goa) करत असाल तर जरा थांबा. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Goa CM Doctor Pramod Sawant) यांनी काही आदेश जारी केले आहेत.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आहेच. त्यात इतर आज्यांमधून गोव्याला पर्यटक आल्यामुळे गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्यात जोपर्यंत सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यातील पर्यटन व्यवसाय संपूर्ण बंद असणार आहे असे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

हे वाचा - काय सांगता! इथं खरंच येतो 'जादू'?; सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस होतात बंद

गोवा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे गोव्यातील सर्व नफरकांना लसीचा पहिला डोस जुलै 2021 च्या शेवटपर्यंत दिला जाणार आहे. संपूर्ण नागरिकांना लस मिळाल्यांनतरच पर्यटनाबाबत विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय.

त्यात सध्या मॉन्सूनचा काळ असल्यामुळे किनारपट्टी भागातील राज्यांसाठी हा पर्यटनाचा काळ नाहीये. त्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी असेल. म्हणून . लसीकरणानंतरच संपूर्ण गोव्यातील पर्यटन व्यवसाय सुरु करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

Published by: Atharva Mahankal
First published: June 17, 2021, 3:12 PM IST

ताज्या बातम्या