मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय सांगता! इथं खरंच येतो 'जादू'?; सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस होतात बंद

काय सांगता! इथं खरंच येतो 'जादू'?; सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस होतात बंद

या वाळवंटात रेडिओ फ्रीक्वेन्सी निरुपयोगी होते यामागचं गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

या वाळवंटात रेडिओ फ्रीक्वेन्सी निरुपयोगी होते यामागचं गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

या वाळवंटात रेडिओ फ्रीक्वेन्सी निरुपयोगी होते यामागचं गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

मॅक्सिको, 16 जून : जादू म्हटलं की प्रत्येकाला आठवते की कोई मिल गया ही फिल्म. हा एलिअन पृथ्वीवर येताच सर्व लाइट्स जातात, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काम करणं बंद करतात, हे आपण फिल्ममध्ये पाहिलंच आहे. असं प्रत्यक्षात घडतं, ते  मॅक्सिकोच्या (Mexico) चिहुआहुआ वाळवंटात. मेक्सिकोच्या या रहस्यमय वाळवंटाजवळ जाताच सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करणं थांबवतात. इथं (Chihuahua desert) परग्रहांवरचे लोक म्हणजे एलियन (Alien) येतात, असा इथल्या स्थानिक लोकांचा विश्वास आहे.  शास्त्रज्ञांचा मात्र याबाबत वेगळा तर्क आहे.

या भागाला झोन ऑफ सायलेन्स (Zone of Silence) म्हणतात.  या वाळवंटात रेडिओ फ्रीक्वेन्सी निरुपयोगी होते यामागचं गूढ अद्यापही उलगडलेले नाही. 1970 मध्ये या जागेबद्दल प्रथम संशोधन सुरू झाले. एक अमेरिकन क्षेपणास्त्र या भागात कोसळलं. ते क्रॅश का आणि कसं झालं याचा शोध घेण्यासाठी जेव्हा तज्ज्ञ मंडळी इथं आली तेव्हा त्यांना आढळलं की जीपीएस (GPS) गोल गोल फिरत आहे. त्यानंतर यूएसएअरफोर्सच्या (USA Airforce) पथकानं  अधिक तपास केला असता, कंपास, जीपीएसच काय कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (Electronic Device) इथं काम करत नसल्याचं त्यांना आढळलं.

हे वाचा - आश्चर्यच..! मृतदेहाजवळ बसून वारंवार हाक मारू लागली आई आणि मुलगा झाला जिवंत

हा एक प्रकारचा डार्क झोन होता. इथं टीव्ही सिग्नल, रेडिओ, शॉर्ट वेव्ह किंवा उपग्रह सिग्नल पोहोचू शकले नाहीत. त्यामुळं या तपास पथकानं या जागेला ‘झोन ऑफ सायलेन्स’ असं नाव दिलं. त्यानंतर इथं संशोधन झालं; पण इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडण्यामागचं काहीही कारण सापडलं नाही. त्यानंतर  मेक्सिकन सरकारनं इथली रहस्यं उलगडण्यासाठी म्हणून एक मोठी लॅब तयार केली, तिला ‘द झोन’ (The Zone Lab) असं नाव देण्यात आलं. या गूढरम्य जागेवरील वनस्पती आणि कीटकांवरही संशोधन केलं जात आहे. मात्र इथं कोणतेही सिग्नल मिळत नसल्याचा फायदा घेत सरकार वेगळ्या प्रकारचे संशोधन करत असल्याचा संशयही वेळोवेळी व्यक्त करण्यात आला आहे.

या जागी होता समुद्र

प्राथमिक पातळीवरील संशोधनातून या झोन ऑफ सायलेन्समध्ये चुंबकीय गुणधर्म (Magnetic Properties) असल्यानं सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र असे गुणधर्म निर्माण होण्यामागे काय कारण आहे हे उघड होऊ शकलेलं नाही. या ठिकाणी लाखो वर्षांपूर्वी समुद्र होता हे स्पष्ट झालं असून त्याला ‘थेटीजचा समुद्र’ (Sea of Thetys) म्हणतात. म्हणजेच ही जागा त्या समुद्राचा पृष्ठभाग आहे. झोन ऑफ सायलेन्सपासून सुमारे 25 मैलांच्या अंतरावर मानवी वस्ती आहे. तिथं सर्व सुविधा आहेत; झोन ऑफ सायलेन्समध्ये लोकांचा वावर नाही. इथं हॉटेल किंवा अन्य कसल्याही सुविधा नाहीत. या जागी येताच आपला जगाशी संपर्क तुटतो, त्यामुळं इथं येण्यास कोणीही धजावत नाही.

स्थानिक लोकं म्हणतात...

स्थानिक लोकांना मात्र इथं काहीतरी अलौकिक शक्ती किंवा एलियन्सचं वास्तव्य आहे, असं वाटतं. आकाशातील चमकदार गोष्टींशी ते संपर्क साधतात, असं स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. इथल्या वाळवंटात काही निवडक वनस्पती आहेत, त्या  सतत आगीत जळत असतात. याचं कारणही शोधलं जात आहे.

हे वाचा - गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच बसला धक्का

दरम्यान, मेक्सिकोलेसट्रॅव्हल्ड या वेबसाइटच्या अहवालात एका टीव्ही क्रूचा उल्लेख आहे जो इथं आल्यानंतर खूप घाबरला. त्यांना रस्ता सापडेना त्यावेळी विचित्र दिसणार्‍या काही लोकांनी त्यांना बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. या विचित्र दिसणाऱ्या लोकांचे चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी लांब रेनकोट्ससारखे कपडे घातलेले होते. या लोकांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

First published:

Tags: Mexico, USA, Viral