मराठी बातम्या /बातम्या /goa /आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या भीतीने काँग्रेसने आपल्या 11 पैकी 5 आमदारांना चेन्नईला हलवले आहे (Goa Congress MLA in Chennai). राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती काँग्रेसला आहे

पणजी 17 जुलै : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्याच्या राजकारणातही (Goa Politics) मोठा भूकंप येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी वेळीच सावधगिरीची पाऊलं उचलली आणि गोव्यातील बंड शांत झाल्याचं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, गोव्यातील राजकीय घडामोडींमधील उलथापलथ अजूनही सुरुच आहे. आता राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? ट्विट करत दिपाली सय्यद यांनी मानले भाजपचे आभार

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या भीतीने काँग्रेसने आपल्या 11 पैकी 5 आमदारांना चेन्नईला हलवले आहे (Goa Congress MLA in Chennai). राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती काँग्रेसला आहे. 5 आमदारांमध्ये काँग्रेसचे उपनेते संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. याशिवाय युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा या चौघांचा यात समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदारांनी भाजपशी संधान न साधता काँग्रेसशी निष्ठा कायम राखावी यासाठी ही अधिकची काळजी घेतली गेली आहे. आमदारांची भाजपशी जवळीक होऊ नये यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने दखल घेतली असल्याचं बोललं जात आहे.

...हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर, टाळेबंदीचा डाव, शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह उरलेले सहा आमदार गोव्यातच आहेत. गोव्यातील राजकीय घडामोडी पाहता बंडाती कुणकूण आधीच लागलेली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती काँग्रेसला असल्याने पक्षाने सावध पवित्रा घेत आपल्या पाच आमदारांना चेन्नईला रवाना केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Goa, Political tension