मराठी बातम्या /बातम्या /goa /

Goa Election: काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी कोणाला नारळ?

Goa Election: काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी कोणाला नारळ?

गोवा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) काँग्रेसने (Goa congress) उमेदवारांची (Goa congress candidate list) तिसरी यादीही जाहीर केली आहे. पक्षाने तिसऱ्या यादीत एकूण नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने आतापर्यंत 26 जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

पणजी, 18 जानेवारी : मागच्यावेळी हातात आलेली सत्ता भाजपने घेतल्याने काँग्रेस (Goa congress) यावेळी सावध पावलं टाकताना दिसत आहे. मात्र, यंदा ममता दीदींचा तृणमूल काँग्रेस आणि केजरीवाल यांचा आप निवडणूक रिंगणात उतरल्याने काँग्रेसची काही समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी (Goa congress candidate list) जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेस पक्षाने नऊ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. अशाप्रकारे काँग्रेस पक्षाने 40 विधानसभा जागांसाठी 26 उमेदवारांची निवड केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत काँग्रेसने 7 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

14 फेब्रुवारीला गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी देशातील सर्वात लहान राज्यात भाजप-काँग्रेसशिवाय आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसही निवडणूक रिंगणात आहेत. 'आप'कडून निवडणुकीसाठी 20 उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या बाजूनं कोण रिंगणात?

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या बाजूने मेघश्याम राऊत, अमन लोटलीकर, मिचेल लोबो, विकास प्रभूदेसाई, अँथोनी एल फर्नांडीसधर्मेश सगलानी, लावू मामलेकर, प्रसाद गावकर, जनार्धन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जितेंद्र गावकर, लुई फर्नांडिस, मनीषा शेणवी उसगावकर, राजेश फळदेसाई, कॅप्टन विरातो फर्नांडिस, अवेर्तनो फुर्ताडो Avertano Furtado आणि ओलेन्सियो सिमोस Olencio Simoes यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी, या निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस उत्तर गोव्यातील मायेम Mayem आणि दक्षिण गोव्यातील फातोर्डा Fatorda येथून उमेदवार उभा करणार नाही.

"BJP गोव्यात नोटांचा पाऊस पडतंय, पण फडणवीस गोव्यात गेले अन् पक्षच फुटला"

शिवसेना काँग्रेससोबत येणार का?

गोव्याच्या रणसंग्रामात शिवसेना काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवणार की नाही, याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी गोवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर ते म्हणाले होते की, राज्यात संभाव्य युतीबाबत दीर्घकाळ चर्चा झाली. सध्या शिवसेना राष्ट्रवादीसोबत निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

गोव्यात भाजपला मोठा धक्का; मायकल लोबोंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मात्र, एवढे करूनही गोवा काँग्रेससाठी फार कठीण जाणार आहे. अनेक आमदारांनी पक्ष सोडला आहे आणि तृणमूल रिंगणात उतरल्याने अनेक समीकरणेही बदलली आहेत. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं येणंही काँग्रेससाठी कठीण झालं आहे. आता यावर पक्ष मात करू शकतो की नाही, हे निकालाच्या दिवशी म्हणजे 10 मार्चला स्पष्ट होईल.

First published:

Tags: Election, Goa, काँग्रेस